ब्रेकिंग
साई मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा!
0
9
1
3
8
2
शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्रौ १० ते १२ यावेळेत श्रींचे समाधी मंदिरातील स्टेजवर ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे श्रीकृष्ण जन्माचे किर्तन व श्री कृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मंगळवार, दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाचे स्टेजवर गोपालकाला किर्तनाचे आयोजन करणेत आले आहे. तसेच दहीहंडीचा कार्यक्रम हा समाधी मंदिरात होणार आहे.
0
9
1
3
8
2