वीज प्रश्न अधिकाऱ्यांना घेराओ घालणार डॉ. वंदनाताई मुरकुटे
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
भेर्डापूर परीसरात वीजेचा खेळखंडोबा शेतक-यांचे शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना घेराओ घालणार.-
टाकळी भान प्रतिनिधी – संपूर्ण श्रीरामपुर तालुक्यातच विजेचे आरोग्य धोक्यात आले असुन भेर्डापूर परीसरात तर विजेची अवस्था दयनीय झाली आहे.
वाफ्यात पाणी पोहोचले की विजेचा झटका जाणवतो त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. वीजमंडळाचे अधिकारी थातुरमातुर उत्तरे देऊन शेतकन्यांची बोळवण करीत आहेत. शेतक-यांच्या शिष्टमंडळासह आपण विजमंडळाच्या वरीष्टांना “घेराओ” घालु असा परखड इशारा श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी दिला आहे..
विजमंडळाच्या वरीष्टांना दिलेल्या निवेदनात डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी म्हटले आहे, की खरीप हंगामातील ऊस, भुईमुग, तुर, कापूस, सोयाबीन ही पिके हातातोंडाशी आली आहेत. शेतकयांनी रात्र-दिवस काबाडकष्ट करून जगवीलेली, जोपासलेली पिके विजेअभावी जळून चालेली आहेत. विहिरीत पाणी असूनही विजेच्या खेळखंडोबाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वीजमंडळाकडे चौकशी केल्यास ” लाईट वरून गेली ” असे ठोकळेबाज उत्तर दिले जाते.
भेर्डापूर – वांगी परीसारतील शेतातील पिके जळण्याचे प्रमाण वाढले असुन भेर्डापूर येथील शेतकन्यांना सध्या गणेशखिंड, मातापूर व राहुरी तालुक्यातील पाथरे खु. या लांबअंतराच्या सबस्टेशनमधुन वीजपुरवठा केला जातो. भेर्डापूर येथे पाच एम. व्ही. ए. क्षमतेचे स्वतंत्र सबस्टेशन व्हावे अशी मागणी शेतकयांनी केली असून विजउपकेंद्रासाठी शासकीय जागा उपलब्ध असून भेर्डापूर ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव विज मंडळाला दिला आहे.
हे सबस्टेशन झाल्यास विज टंचाईची समस्या दूर होईल.
विजमंडळाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन शेतकरी त्रस्त झाले आहे. रोहीत्रांची क्षमता वाढवून मिळावी अशी मागणी करून शेतकरी थकले आहेत. राजाने मारले, पावसाने झोडपले तर दादफिर्याद कुणाकडे द्यायची अशी शेतक-यांची अवस्था झाली आहे.
विजमंडळाच्या अधिकार्यांनी ताबडतोबीने लक्ष घालून विजपुरवठ्यात सुधारणा करावी अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता विजमंडळाच्या वरिष्ठांना “घेराओ” घालू असा इशारा डॉ. वंदनाताई मुरकुरटे यांनी दिला आहे.