Breaking
ब्रेकिंग

टाकळीभान येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.

0 9 1 3 7 8

 

टाकळीभान, ( वार्ताहर )

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील पुरातन यादव कालीन व प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्सव सोहळा बुधवार दिनांक १७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक १७ जुलै रोजी पहाटे ३ तेे ४ अभिषेक व त्यानंतर श्री विठ्ठल रूख्मिणी यांच्या मूर्तींना गंगाजलाने स्नान व महापूजा होवून ५.३० वाजता प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या हस्ते उत्सव मूर्ती पूजा व आरती होणार आहे. दुपारी १२ वाजता आरती, २ ते ५ भजन, ५ वाजता दिंडी निघणार असून दिंडीची ग्राम प्रदक्षिणा झाल्यावर सायंकाळी ६ वाजता आरती व रात्री किर्तन होणार आहे.

आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पोर्णिमा या दरम्यान येथील आषाढी उत्सव साजरा केला जातो.या दरम्यान दररोज ग्रामस्थांकडून अन्नदान केले जाते.दररोज सायंकाळी ५ वाजता दिंडी काढली जाते. ग्राम प्रदक्षिणा करून दिंडी मंदिरात आल्यावर आरती होवून महाप्रसाद दिला जातो. चतुदर्शीच्या दिवशी भंडारा केला जातो. या दिवशी टाकळीभान व परिसरातील व अन्य ठिकाणाहून भजनी मंडळ टाळ, मृदुंग, वीणा यासह दिंड्या घेवून येतात व श्री. विठ्ठलाच्या दरबारी हजेरी लावतात.रात्रभर जागर करून सकाळी प्रसाद घेवून जातात. पोर्णिमेच्या दिवशी दहिहंडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते.

टाकळीभान व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री विठ्ठल रूख्मिणीचे मंदिर फार पुरातन यादव कालीन आहे.संपुर्ण मंदिर दगडी बांधकामाचे असून मंदिरामध्ये सुंदर नक्षीकाम केलेले आहे. येथील श्री विठ्ठलाची मूर्ती ही चर्तुभूज विष्णू स्वरूप आहे. दोन हात कमरेवर असून उर्वरीत दोन हातांपैकी एका हातात शंख व एका हातात चक्र आहे. ओठावर मिशा आहेत मस्तकी स्पष्ट दिसेल असे शिवलिंग आहे. छातीवर कौस्तुभमणी व त्याखाली वत्सलांचन असून पायी पद्म असलेली देखणी मूर्ती आहे. शेजारी सर्वांग सुंदर रूख्मिणी मातेची मूर्ती आहे.

आषाढी एकादशी उत्सवा निमित्त मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात येते तसेच मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई केली जाते आषाढी उत्सव हा येथील पर्वणीचा काळ असल्याने भाविक, ग्रामस्थ कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेली मंडळी या आषाढी उत्सव सोहळ्यासाठी गावाकडे परत येतात कारण श्रद्धा, भक्ती याला तोड नाही. भाविक श्रद्धेने श्री. विठ्ठलाच्यापुढे नतमस्तक होतात आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात व नवसाची फेड करतात.                               आषाढी एकादशी निमित्त टाकळीभान व परिसरातील भाविक श्री. विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर पुजारी, ट्रस्ट मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे