टाकळीभान येथे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी शासकीय यंत्रणा सरसावली…
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शासकीय जागेत बेकायदेशीर अतिक्रमण झालेले आहे यामध्ये तलाठी ऑफिस कार्यालय जवळ, तसेच जिल्हा परिषद शाळेजवळ अतिक्रमण झालेले आहे. सदर अतिक्रमण हे शासकीय जागेवर बेकायदेशीररित्या केले असून,
वृत्तपत्राने दखल घेऊन बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्या संदर्भात तहसीलदार मिलिंद वाघ यांनी तातडीने या गैर कृत्याची दखल घेऊन ताबडतोब दुसऱ्या दिवशी मंडळ अधिकारी, रेवेन्यू अधिकारी व ग्रामसेवक यांना झालेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे सर्व अधिकारी जेसीबी घेऊन झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता अतिक्रमण धारकांशी चर्चा केली. व झालेले अतिक्रमण काढणार असे अधिकाऱ्यांनी त्यांना बजावले परंतु यावर अतिक्रमणधारकांनी अगोदर जिल्हा परिषद शाळे जवळ व ग्रामपंचायत शेजारी अतिक्रमण काढावे त्यानंतर आमचे पत्राच्या गाळ्याचे अतिक्रमण आम्ही हाताने काढू ,असे अतिक्रमण धारकांनी शासकीय अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी मंडळाधिकारी प्रशांत ओहोळ म्हणाले की शासकीय जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढू व आडवे येणाऱ्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी ग्रामसेवक रामदास जाधव व रेवेन्यू अधिकारी कामगार तलाठी तसेच कोतवाल सदाशिव रणनवरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.