राजुरी सोसायटीच्या चेअरमनपदी सोपान कदम तर व्हॉ चेअरमनपदी सुधीर गोरे यांची बिनविरोध निवड.
राजुरी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजुरी सोसायटी चेअरमन पदी सोपान कदम तर व्हाईस चेअरमन पदी सुधीर भाऊ गोरे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राहाता तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड नुकतीच पार पडली. राहता तालुका उपनिबंधक श्री खेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार श्री शेख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक श्री सोपान भिकाजी कदम यांची चेअरमन पदी तर युवा संचालक श्री सुधीर बन्सी पाटील गोरे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक डॉक्टर सोमनाथ पाटील गोरे, मावळते चेअरमन नानासाहेब पाटील गोरे, मावळते व्हाईस चेअरमन बाबासाहेब राहींज, चंद्रभान अण्णा गुंजाळ, सुरेश नारायण कसाब, अशोक शहाराम पाटील गोरे, गंगाधर रामजी पाटील लाळगे, बाळासाहेब भालेराव, संजय रायभान पाटील गोरे, महिला संचालिका हिराबाई खर्डे व निर्मला सूर्यभान पाटील गोरे हे सर्व संचालक उपस्थित होते. निवडीनंतर सोसायटीचे माजी चेअरमन रामजी पाटील लाळगे, सूर्यभान पाटील गोरे, रावसाहेब गोपाजी पाटील गोरे, आर डी कदम, सुरेश गोरे, आर आर गोरे सर, दत्तात्रेय काशिनाथ पाटील गोरे, शिवनाथ पाटील गोरे, विष्णुपंत खर्डे, सोसायटीचे माजी चेअरमन मच्छिंद्र पाटील पठारे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष जालिंदर पाटील पठारे, जना मामा लाळगे, विठ्ठल मोरे, रोहित तुपे, नानासाहेब शेंडगे संभा गोरे, रामा गोरे, सतीश तेलोरे, संस्थेचे सचिव बाळासाहेब नामदेव गोरे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजुरी सोसायटी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील व सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी राहता तालुक्यातील अग्रगण्य संस्था आहे. गरजू सभासदांना कर्ज वाटप, नियमाने वसुली करणे, सभासदांना वेळेवर खतपुरवठा व रेशन वाटप संस्थेतर्फे अतिशय व्यवस्थितपणे केली जाते, डिव्हिडंट दिला जात आहे.