टाकळीभान येथील कामगार तलाठी कार्यालयात कोणतीही खाजगी व्यक्ती ठेवण्यात येऊ नये..
अन्यथा 9 जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषण इशारा. सामाजिक कार्यकर्ते संजय रणनवरे
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
टाकळीभान येथील कामगार तलाठी कार्यालयात कोणतीही खाजगी व्यक्ती ठेवण्यात येऊ नये .अन्यथा 9 जानेवारीला तहसील कार्यालया समोर उपोषण,असा तक्रारी अर्ज टाकळीभान सोसायटीचे माजी संचालक व सामाजिक कार्यकर्ते, संजय संपत रणनवरे यांनी तहसीलदार यांना देण्यात आला आहे,
दिलेल्या तक्रार अर्जात रणनवरे यांनी म्हटले आहे की , श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान कामगार तलाठी कार्यालय मोठे असून गेल्या तीन ते चार महिन्यापासून टाकळीभान कामगार तलाठी कार्यालयात खाजगी सहाय्यक व्यक्ती ठेवून नये म्हणून सविधान ग्रुप, नंदकिशोर जाधव व संजय संपत रणनवरे यांनी याबाबत तहसीलदार यांना याबाबत निवेदने दिलेली होती.
नंदकिशोर जाधव यान टाकळीभान तलाठी कार्यात खाजगी सहाय्यक व्यक्ती ठेवण्यात येऊ नये म्हणून अर्जही केला होता ,त्याच्या अर्जावरून तहसीलदार यांनी तलाठ्यास नोटीस काढून खाजगी व्यक्ती ठेवल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल , असा अशी नोटीस विद्यमान तलाठी कचेश्वर भडकवाड यांना देण्यात आला होती पण वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करत, त्यांच्या हाता खाली एक नव्हे तर दोन खाजगी सहाय्यक व्यक्ती ठेवण्यात आलेली आहेत ,याचाच अर्थ टाकळीभान तलाठी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत असून याचा भरणा महसूल विभागाकडे किती होतो, हे मात्र गुलदस्त्यात आहे,
तसेच सन 2022 ते 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करीत असताना तलाठी च्या हाताखाली खाजगी व्यक्ती याने मला पैसे दिले तरच तुमचे पंचनामे होतील, नाहीतर या गावाला एक रुपये मिळून देणार नाही तशी त्याची क्लिपही व्हायरल झाली होती, असा सज्जड इशारा या खाजगी व्यक्तीने दिला होता, असे असताना या खाजगी व्यक्ती बाबत तलाठी यांना याला कामाला कामावर घेण्यासाठी एवढा अट्टाहास का? करीत आहे, याचाच अर्थ हा व्यक्ती गौन खनिज व वाळू तस्करी बाबत माहिती देत असतो यामुळे त्याला कामावर घेण्यासाठी गावातील पुढारी व त्याचे मित्र मंडळ व नातेवाईक जीवाचा आटापिटा करीत आहे, या व्यक्ती कामास ठेवल्यास मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तहसील कार्यालयासमोर कोणतीही पूर्व सूचना न देता 9 जानेवारी रोजीउपोषणास बसणार आहे.माझ्या जीवितास व माझ्या कुटुंबास काही बरे वाईट झाले तर याला सर्वस्वी जबाबदार महसूल विभाग राहील याची नोंद घ्यावी. तक्रारीच्या प्रती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अहमदनगर, प्रांताधिकारी श्रीरामपूर, तहसीलदार, टाकळीभान कामगार तलाठी व तालुका पोलीस स्टेशन श्रीरामपूर यांना देण्यात आल्या आहेत,
चोकट-काही महिन्यापूर्वी तलाठीच्या हाताखालीस खाजगी सहायकाने शेतकऱ्याचे अवकाळी पावसाचे नुस्कान याची पंचनामाचे पैशाच्या मागणीची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्याची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार लहू कानडे यांच्याकडे केली होती, त्यावर आमदारांनी प्रांत व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून तत्कालीन तलाठी दोशी धरून निलंबित केला होता, त्याच खाजगी युतीला परत तलाठी हाताखाली घेतल्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे,