Breaking
ब्रेकिंग

अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सत्तर वृक्षांचे पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण

0 9 1 3 8 2

 

टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)

त्रिमूर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोगरगाव येथे संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ७० वृक्षांचे पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण

त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेचे त्रिमूर्ती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घोगरगाव ता. नेवासा या ठिकाणी संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून विद्यालयामध्ये पत्रकार बांधवांच्या हस्ते ७० वृक्षांचे रोपण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार चंद्रकांत लांडगे होते. तसेच व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, बापूसाहेब नवले , निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्जुन राऊत, विलास धनवटे, प्राचार्य संतोष जावळे सर, उपप्राचार्य संगीता झिंजुर्डे मॅडम, बाळासाहेब आव्हाड आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य पत्रकार अर्जुन राऊत यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करून सध्याच्या काळात वृक्षारोपण शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. मानवाने स्वतःच्या भौतिक सुखासाठी निसर्गाचा ऱ्हास केला असून पाणी ,जल, हवा सर्व दूषित व प्रदूषित होत आहे. यामुळे मानवाचे जगणे दिवसेंदिवस मुश्किल होणार असून वृक्षरोपण व व त्याचे संवर्धन हा एकच पर्याय माणसा पुढे आहे. त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. तसेच सध्याचे युद्ध हे पर्यावरण संरक्षणासाठी असून आपल्या अस्तित्वासाठी ते सर्वांना जिंकायचे आहे असे ते म्हणाले.

यावेळी बापूसाहेब नवले म्हणाले की वृक्षारोपण या सुंदर उपक्रमाचे विद्यालयाने आयोजन केले असून अशा उपक्रमांची गरज असल्याचे व्यक्त केले. यावेळी पत्रकार व मान्यवरांच्या हस्ते ७० वृक्षांचे रोपण करण्यात आले.घोगरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये अशी दर्जेदार शैक्षणिक शाखा व सर्व सोयीनुक्त वस्तीगृह असल्याबद्दल तसेच शाळेचा स्वच्छ परिसर ,टापटीपणा व शाळेची प्रगती व व्यवस्थापन याचे सर्व पत्रकार बांधवांनी कौतुक केले.

या वृक्षारोपणाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य यांचा निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष जावळे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी , एस. आर. काळे सर,मनेष वेताळ सर

, नितीन साळवे सर, जयश्री छल्लारे, ललिता गारूळे,सविता आव्हाळे, वृषाली तुवर ,वनिता नानेकर,जगताप मॅडम, कवठाले मॅडम ,दिवे मॅडम, संभाजी गारुळे, कौटे सर,राम कुलभेय्या,त्रिभुवन सर,सरोदे सर,सावंत सर,अनिल पटारे,कांबळे सर,पूजा ढोकणे आदीसह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सर्वांचे आभार अमोल बहिरट सर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे