भारतीय संविधान ही भारतीयांची अंगीकृत जीवनशैली व्हावी… डॉ.वसंत जमधडे.
श्रीरामपूर(सत्तेचा महासंग्राम न्युज)
भारत हा विविध प्रांत,धर्म,जात,पंथ आणि विविधतेने नटलेला देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना सक्षमपणे जगता यावे म्हणून संविधानाची रचना केली. असे भारतीय संविधान ही दररोजच्या जगण्याची अंगीकृत अशी जीवनशैली व्हावी असे मत विचार जागर मंचचे संस्थापक,सचिव डॉ. वसंत जमधडे यांनी व्यक्त केले.
येथील विचार जागर मंचतर्फे गावोगावी, शाळा, कॉलेजात भारतीय संविधान जनजागरण अभियानांतर्गत टाकळीभान येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित भारतीय संविधान अभियान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वसंत जमधडे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते तर डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार अर्जुन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती पर्यवेक्षक ए.डी. बनसोडे यांनी सर्वांचे स्वागत केले. आदिनाथ पाचपिंड यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी पी.एच्. बनकर, सौ. व्ही.एच. सोनवणे, एस.जी. काळे, ए.जे. टेकाळे, एस.पी. नरवडे आदी ज्येष्ठ शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वाचन संस्कृती उपक्रमांतर्गत पर्यवेक्षक बनसोडे, पत्रकार अर्जुन राऊत, तसेच विद्यार्थी प्रशांत गायकवाड, कृष्णा साईनाथ खंडागळे आदी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. विचार जागर मंचतर्फे विद्यार्थी वर्गास भारतीय संविधान प्रास्ताविका ५०० कार्डपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. वसंत जमधडे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व सांगून विद्यार्थी दशेतच हे संस्कार रुजणे गरजचे असल्याचे सांगून शाळेचे कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी भारतीय संविधान म्हणजे भारतीयांचा सार्थ अभिमान आहे. लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. रयत शिक्षण संस्था ही समाजपरिवर्तनाची आणि माणुसकीच्या मूल्यांची पेरणी करणारी प्रयोगशाळा आहे, संविधान मसुदा समितीचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण आणि माणुसकीयुक्त राज्यघटना दिली. त्या राज्यघटनेचे
पावित्र्य, वाचन, चिंतन आणि आचरण झाले तरच भारत समर्थ, संपन्न होईल असे सांगून भारतीय संविधान कविता सादर केली. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी भारतीय संविधान हा आपल्या आत्मीय जगण्याचा, वागण्याचा विषय झाला पाहिजे.त्यासाठी हे अभियान अधिक गतिशील होण्यासाठी शिक्षक, विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन पाचपपिंडसर यांनी केले तर काळेसर यांनी आभार मानले.