Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

छावा ब्रिगेडचे गुजरे यांच्या विरोधात २६ जानेवारीला आझाद मैदान येथे आंदोलन..

0 9 1 3 8 2

 

 

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया

 

श्रीरामपूर (सत्तेचा महासंग्राम न्युज)

छावा ब्रिगेडचे भ्रष्ट आधिकारी गुजरे यांच्या विरोधात २६ जानेवारीला आझाद मैदान येथे आंदोलन.

मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन
छावा ब्रिगेडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गुजरे यांच्या बदली साठी मुख्यमंत्री यांना निवेदन  आंदोलनाचा इशारा‌

श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर येथे अनेक वर्षापासून शाखा अभियंता म्हणून कार्यरत असणारे परंतु राजकीय हस्तक्षेप असल्याने उपअभियंता म्हणून कार्य करणारे व त्यांची वाड़ा जिल्हा पालघर या ठिकाणी नियुक्ती १ वर्षापासून देण्यात आली .परंतु त्या ठिकाणी हजर न होता श्रीरामपुर लाच उपअभियंता म्हणून कार्यरत राहून अनेक कामामध्ये तफावत ठेवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून जनतेच्या पैसावर डल्ला मारणाऱ्या श्री.नितिन नाथा गुजरे यांच्यावर कड़क कार्यवाही करण्यात यावी व वाडा मध्ये तत्काळ बदली करण्यात यावी गुजरे यांनी श्रीरामपुर येथे च भ्रष्टाचार करण्यासाठी तळ ठोकून कार्यरत राहिले उपविभागात कार्यरत असताना ठेकदारासोबत हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्यांच्या मर्जीतील ठेकेदारास कामे देऊन नित्कृष्ठ दर्जाची कामे केली .

थातूरमातूर कामे करून बिले काढण्यात आली अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची विशेष बाब म्हणून त्यांना श्रीरामपूर येथेच उपविभाग उपअभियंता म्हणून कार्यरत ठेवले  नितीन गुजरे यांच्या माध्यमातून झालेल्या कामाची आपल्या स्तरावरून आमच्या समक्ष कोर टेस्टिंग करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यावर दहा दिवसाच्या आत कडक कारवाई करण्यात यावी व त्यांची जिल्हा बाहेरील अथवा वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी त्वरित रवानगी करण्यात यावी.

अन्यथा छावा ब्रिगेड च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन दिनांक २६ जानेवारी करण्याचा इशारा छावा ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष श्री विश्वनाथ वाघ,प्रदेश महासचिव राहुल रेले,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे यांनी निवेदन दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे