सावळीविहीर व परिसरात ना.विखे पा. यांच्यामुळे विविध विकास कामे! नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण! एमआयडीसी मध्ये प्रत्येक घरातील एका तरुणाला निश्चित मिळणार रोजगार–मा.खा. डॉ. सुजय विखे पा.
शिर्डी ( राजकुमार गडकरी)
शिर्डी मतदारसंघातील सावळीविहीर व परिसरातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला येथील एमआयडीसीमध्ये रोजगार मिळणार आहे . तसेच खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न आणि संस्थानातील कंत्राटी कामगारांचे अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेला प्रश्न महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नामुळे मार्गे लागला व त्याचा आज आनंद खूप मोठा असल्याची भावना डॉ.सुजय विखे पा. यांनी व्यक्त केली.
राहाता तालुक्यातीलसावळीविहीर बुद्रुक येथे आज बुधवारी विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी तसेच महिला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिट वितरण कार्यक्रम येथील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, सरपंच ओमेश जपे, उपसरपंच विकास जपे, शांताराम जपे, जिजाबा आगलावे, गणेश आगलावे, गणेश कापसे, सोपान पवार, आशिष आगलावे ,प्रदीप नितनवरे , कैलास सदाफळ, सोसायटी, ग्रामपंचायत,विविध संस्थांचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकरी व पदाधिकारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी व महिला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिट वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील आजपर्यंतच्या विकासाच्या संदर्भात बोलताना सांगितले की,राहाता तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न आणि शिर्डी येथील साई संस्थानातील कंत्राटी कामगारांचे अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मार्गे लागला व त्याचा आज आपण सर्वांनाच होत असलेलाआनंद खूप मोठा असल्याची भावना यावेळी डॉ.सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवली.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात बोलताना सांगितले की, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून खंडकरी शेतकऱ्यांचे जमिनींचे वर्गीकरण आणि इतर तांत्रिक बाबी सोडवून, 250 कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे.
सावळीविहीर येथे एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला रोजगार मिळणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. शेती महामंडळाच्या ५०० एकर जागेत एमआयडीसी निर्माण होत असून त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. पुढील पाच वर्षांत मत मागायला येईल तेव्हा सावळी विहीर येथील प्रत्येक घरातील व्यक्तीला या प्रकल्पातून रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विरोधकांवर जोरदार टीका करताना विखे पाटील म्हणाले, “जे माजी महसूल मंत्री सात वर्षे पदावर होते, त्यांना गरिबांची आठवण का झाली नाही? त्यांनी या जनतेसाठी एक तरी काम केले आहे का? आता निवडणुका जवळ आल्या की हे नेते समाजात फिरताना दिसतात. परंतु, विखे पाटील परिवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो.”
डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, सोमय्या औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या संदर्भात आराखडे तयार आहेत आणि लवकरच या वसाहतीतील समस्या सोडवल्या जातील. तसेच, या वसाहतीत महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. एमआयडीसी व पशुवैद्यकीय दवाखान्यातील आवश्यक वस्तूंसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कापडी पिशव्या आणि इतरया कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केले.विकास कामे मार्गी लागल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्य पुरवले जाईल, आशी ग्वाही त्यांनी दिली.शिर्डी मतदारसंघातील सर्वच प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवले जात असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेले विविध प्रकल्प आणि योजना यामुळे या भागात प्रगतीची गंगा वाहत असल्याचे डॉक्टर सुजय विखे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला सावळीविहीर सह परिसरातील नागरिक, महिला, लाभार्थी ,विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.