मनोज जरांगे पाटील यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन.. हरिनाम सप्ताह सोहळ्यास मनोज जरांगे पाटील यांची भेट..
शिर्डी( राजेंद्र दुनबळे )
मनोज जरांगे पाटील यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन.. हरिनाम सप्ताह सोहळ्यास मनोज जरांगे पाटील यांची भेट..फटाक्यांची आतीष बाजी, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या . मनोज जरांगे पाटील यांची कारमधून भव्य अशी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आल
सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. मनोज जरांगे पाटील यांचे रात्री अहिल्यानगर येथून शिर्डीला आगमन होताच साईंच्या नगरीत त्यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतष बाजी, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या व मनोज जरांगे पाटील यांची कारमधून भव्य अशी शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सामील झाले होते.शिर्डी ग्रामस्थ. व कऱ्यकत्यान च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली होती.त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे निमगाव निघोज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. व येथे त्यांचा मुक्काम होता. आज मंगळवार रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीत श्री साई मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे समाधी दर्शन घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्या राहता, शिर्डी, व जिल्ह्यामधील गावांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यावेळी या शांतता रॅली मध्ये सामील झाले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीच्या समारोपासाठी नाशिक कडे मोठ्या कार ताफ्यात रवाना झाले . पंचाळे येथे सुरू असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जाऊन सरला बेट चे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे दर्शन घेतले. . येथेही त्यांचे घोषणा देऊन जोरदार स्वागत करण्यात आले.मनोज जरांगे पाटील यांच्या शिर्डी दौऱ्यानिमित्त व शांतता रॅली निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त राहता, शिर्डी शहरात व नगर मनमाड रस्त्याच्या दुतर्फा तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते.