टाकळीभान येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिरात विधीवत चौकटपुजन सोहळा संपन्न
माजी खा.सदाशिव लोखंडे.डॉ.श्रीकांत भालेराव.प्रशांत लोखंडे यांच्या शुभहस्ते संपन्न.
टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील निर्माणधीन जगदतगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीराचे विधीवत चौकटपूजन सोहळा नूकताच माजी खा.सदाशिव लोखंडे, डाॅ.श्रीकांत भालेराव व प्रशांत लोखंडे यांच्या शुभहस्ते पार पडला.
या प्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार, रोहीदास पटारे, बापूसाहेब पटारे, पोपटराव पटारे, माजी सरपंच बंडू पाटील पटारे, उपसरपंच कान्हा खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी माजी खा. सदाशिव लोखंडे व प्रशांत लोखंडे यांनी संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शक्ती भक्ती निर्माण कार्यासाठी दोन लाख अकरा हजार रूपये वैयक्तीक स्वरूपाची देणगी जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीराच्या सेवेकरी मंडळाकडे सूपूर्द केली. यापूर्वीही लोखंडे यांनी टाकळीभान गावाच्या विकासाकरीता भरभरून निधी दिला असून भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
अनेक देणगीदारांच्या बहूमोल वस्तूरूपी व रोख स्वरूपातील देणगीतून टाकळीभान येथे जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य असे मंदीर साकारत आहे. या मंदीर निर्माणकामी जगदगुरू संत तुकाराम महाराज मंदीराचे सेवेकरी प्रयत्नशिल असून आज मान्यवरांच्या उपस्थितीत चौकट पूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी गूरू सुदाम देवळालकर यांनी पौराहीत्य केले. मा.खा.सदाशिव लोखंडे, डाॅ.श्रीकांत भालेराव, प्रशांत लोखंडे व उपस्थित देणगीदारांचा यावेळी सेवेकरी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास सरपंच, उपसरपंच, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, टाकळीभानसह परिसरातील देणगीदार, भाविक भक्त व सेवेकरी मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट—टाकळीभान गावाचे माझ्यावर प्रेम आहे. या गावाने माझ्या झोळीत भरघोस असे मताचे दान टाकले आहे. त्यातून उतराई होणे हे कदापीही शक्य नाही. असे असले तरी माझ्या परीने मी या गावाच्या विकासाकरीता निधी देण्याचा प्रयत्न केला. तसेच आज या ठिकाणी निर्माण होत असलेल्या जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीरासाठी वैयक्तीक स्वरूपाची देणगी देण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे सांगून यापुढेही अशाच प्रकारे विकासकामाकरीता मदत करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.