अशोकाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ८०० सभासदांचे सभासदत्व रद्द करु नये…प्रा कार्लस साठे.
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
अशोक स.सा. कारखान्याने २०२३ -२४ ज्या ऊस उत्पादक सभासदांनी उसाची इतर कारखान्यांना अन्यविल्हेवाट केल्यामुळे सुमारे ८०० ऊस उत्पादक सभासदांना सभासदत्व रद्द करण्यासाठी नुकतेच नोटीसद्वारे कळविले आहे.
वास्तविक पाहता अशोकने २०२३-२४ या गळीत हंगामात २५ मार्च २०२४ अखेर ५,५३९१० मे. टनाचे उसाचे गाळप केलेले होते. नंतर गळीत हंगाम २०/०४/२०२४ ला संपला व सुमारे ६ लाखापर्यंत मे. टन उसाचे गाळप केले. कारखान्याला गरज नसताना नेहमीप्रमाणे कार्यक्षेत्रातील ऊस गाळपा अभावी तसाच ठेवून गंगापूर ,नेवासा ,राहुरी या कार्यक्षेत्रा बाहेरील भागातून ऊस आणून इतर कारखान्यांना अशोक मार्फत पाठविला.
यावर्षी दुष्काळ असल्यामुळे विहिरी ,बोअर चे पाणी कमी झाले होते, त्यामुळे उसाचे पीक जळाले होते. सभासदांचा ऊस वेळेत न नेल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ नये तसेच आपला भाव फक्त रु. २७००/- मॅट्रिक टन तर प्रवरा कारखान्याचा भाव रु.३०००/- मे. टन होता आणि तो त्यांनी वेळेत दिला. यामुळे सभासदांनी उसाची अन्य विल्हेवाट केली आहे.
आपण मात्र अशोक मार्फत इतर कारखान्यांना ऊस पाठवून अन्य विल्हेवाट करता हे कोणत्या नियमाने करता. सभासदांनी अन्य विल्हेवाट केली तर सदस्य रद्द करण्याची कारवाई करता तशी कायदेशीर कारवाई अशोक कारखान्यावर केली जाईल. २०२३ -२४ या गळीत हंगामात दुष्काळामुळे उसाची कमतरता आहे म्हणून ऊस आणावा लागतो आहे असे सांगितले गेले.
प्रत्यक्षात आपल्या कारखान्याकडे ऊस उपलब्ध असताना केवळ कार्यक्षेत्रा बाहेरील गंगापूर, नेवासा व राहुरी भागातून अशोक बँक वसुलीसाठी सदरचा ऊस आणून इतर कारखान्यांना अशोक मार्फत पाठवून नफा मिळवला जातो. तरी अशोक ने दिलेल्या सभासदत्व रद्द नोटीसा त्वरित रद्द केल्या जाव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला जाईल, याची प्रशासनाने दखल घेऊन सभासदत्व नोटिसा रद्द करण्याची विनंती करत आहोत. अशी मागणी अशोकचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
चौकट: सन २०२३-२४ या गळीत हंगामात अशोकने रु. २७००/- मे. टन पेमेंटचा भाव दिला आहे. आपण पेमेंट बाबत नेहमी इतर कारखान्यांशी तुलना करत असतात, आपला भाव इतरांपेक्षा जास्त असतो. यावर्षी प्रवरा कारखान्याने रु. ३०००/- दर दिलेला आहे. आपणही रु. ३०० /- मे. टनाप्रमाणे अंतिम पेमेंट करावे तसेच कामगारांचे थकलेले सुमारे ७ महिन्याचे पगार त्वरित करावे… प्रा.कार्लस साठे(ऊस उत्पादक सभासद)