आमदार लहुजी कानडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न
गणेश खिंड रस्त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल.
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
गणेशखिंड रस्त्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल आमदार लहू कानडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कानडे साहेब यांनी टाकळीभान ते श्री क्षेत्र गणेशखिंड या रस्त्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल टाकळीभान येथे आमदार लहू कानडे साहेब यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
टाकळीभान ते गणेशखिंड हा अतिशय महत्वाचा रस्ता असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. शेतकरी, शाळकरी मुले यांना या रस्त्यावरून येणे जाणे कठीण होत आहे. त्यामुळे टाकळीभान येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी आमदार मा. लहू कानडे यांच्याकडे नेहमी रहदारी असणाऱ्या या रस्त्याचे काम व्हावे ही मागणी केलेली होती. आमदार लहू कानडे साहेब यांनी टाकळीभान गणेशखिंड परिसरातील लोकांच्या मागणीचा विचार करून हिवाळी अधिवेशनामध्ये या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले. यावेळी आमदार लहू कानडे यांनी लवकरच या रस्त्याचे टेंडर काढून रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, अहमदनगर महानगरपालिकेचे मा. नगरसेवक अशोक नाना कानडे, विष्णुपंत खंडागळे, जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष प्रा. कार्लस साठे सर, तालुका काँगेस चे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, प्रा. दिलीप कोकणे, ऋबंडोपंत बोडखे, संदीप जावळे, नितीन पाटेकर, राहुल जावळे, किरण डुकरे, अर्जुन राऊत,प्रदीप रणनवरे आदी उपस्थित होते.