श्री साईबाबा विषयी अपशब्द बोलल्याबद्दल संभाजी भिडे यांचा, साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांकडून तीव्र निषेध! साई संस्थान कडून गुन्हा दाखल!
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
शिर्डी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या , शिर्डीच्या श्री साईबाबां विषयी अपशब्द बोलणाऱ्या संभाजी भिडे यांचा सर्व थरातून व साई भक्तांमधून, शिर्डी ग्रामस्थांमधून मोठा संताप व्यक्त होत असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
संभाजी भिडे यांनी अमरावती येथे एका व्याख्यानात करोडो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या व संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांविषयी अपशब्द वापरले. त्यामुळे संभाजी भिडे यांचा सर्व साई भक्तांमधून, ग्रामस्थांमधून तीव्र निषेध व्यक्त होत आहे .हा निषेध व्यक्त करण्यासाठी साई भक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी शिर्डी येथील श्री हनुमान मंदिरासमोर निषेध सभा घेऊन संभाजी भिडे यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने शिर्डी पोलीस स्टेशन येथे जाऊन शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना संदीप भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी .अशी मागणी केली. यावेळी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी
संभाजी भिडे यांना अटक करावी अशी मागणी केली.
या सर्व प्रकारामुळे साईबाबांची बदनामी देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निदर्शनास आल्याने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी यांचे आदेशावरून संभाजी भिडे यांनी साईभक्त व ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत व साईबाबांची बदनामी केली आहे म्हणून साई संस्थांनचे सुरक्षा अधिकारी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब परदेशी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान संभाजी भिडे यांनी श्री साईबाबा बद्दल अपशब्द वापरल्यामुळे अनेक साईभक्तांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत .शिर्डी येथे आलेल्या अनेक साई भक्तांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून संभाजी भिडे यांना अटक करावी असे म्हटले आहे.