इंडियन सोशल मुमेंट च्या वतीने वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा अभियान प्रत्येक शाळेत राबवण्याचा संकल्प
शिर्डी(सत्तेचा महासंग्राम न्युज)
राजेंद्र दूनबले
इंडियन्स_सोशल_मुव्हमेंट च्या वतीने वाढत्या महिला अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर महिला सुरक्षा अभियान* प्रत्येक शाळेत राबविण्याचा संकल्प संघटनेकडून करण्यात आला असून, आज त्या निमित्ताने चिंचपाडा जिल्हा परीषद शाळेतील कोल्ही, डूंगी, वरचे ओवळे, कोळी व वघिवली वाडी या शाळेत अभियान राबविण्यात आले.या कार्यक्रमाचा उद्देश फक्त आणि फक्त मुलींमध्ये आणि महिलांमध्ये जनजागृती करून त्यांना अत्याचारापासून सुरक्षित करणे हाच आहे.
१) Good Touch , Bad Touch२) शाळेमध्ये व परिसरात CCTV Camera आवश्यक असते.३) शाळेमधील एजन्सी मार्फत स्वच्छता करणारे कर्मचारी व स्कूल व्हॅन चालक यांचे स्थानिक पोलीस ठाणे अंतर्गत पडताळणी करणे. ४) शाळेत मुख्य ठिकाण तक्रारपेटी आवश्यक असते.५) शासकीय शाळा व खाजगी शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करणे. ६) शाळा व्यवस्थापनाने दर आठवड्याला किंवा पालक मिटींग ला तक्रार पेटी उघडताना सखी सावित्री समिती व पोलीस अधिकारी आवश्यक आहेत.अशाप्रकारे इतर प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनेचा पालन करणे आवश्यक आहे. असे सांगितले आहे. जनजागृती करणे आवश्यक आहे. नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन 112
कार्यक्रमाला उपस्थीत प्रमूख पाहुणे मा.जोगी मॅडम (नायब तहसीलदार)मा. सविता ताई सोनवणे (अध्यक्ष इंडियन्स सोशल मुव्हमेंट)मा. मिनाक्षी गोंधळी (मंडळ अधिकारी)मा. सुषमा पाटील (पोलीस उप निरीक्षक)मा. सचिन खरात (पोलिस सह निरक्षक)ॲड. प्रकाश कदम (महाराष्ट्र अध्यक्ष)ॲड. आनंद गवळीमा. किरण केणी (सामाजिक कार्यकर्ता)