गावातील सामाजिक काम करताना गट तट न करता एकोफ्याचे काम करावे – डॉ सोमनाथ गोरे
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
विजय बोडखे
राजुरी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गटतट न करता एक दिलाने काम केल्यास गावचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन राजुरीचे उपसरपंच डॉ. सोमनाथ बाळासाहेब गोरे पाटील यांनी केले. राहता तालुक्यातील राजुरी येथील प्राजक्त क्लिनिकचा वर्धापन दिन तसेच डॉक्टर सोमनाथ गोरे पाटील यांचा अभिष्टचिंतन कार्यक्रम राजुरी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या प्राणांगणात नागरिकांनी आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते डॉक्टर गोरे पाटील पुढे म्हणाले की गावचा विकास असो किंवा सामाजिक काम असो यामध्ये सातत्याने एकमेकाला साथ देऊन काम केल्यास सामाजिक कामासह गावच्या ही विकासामध्ये अडचण निर्माण होत नाही त्यामुळे गट तट न धरता इथून पुढे सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. गावचे कोणतेही काम असो त्यामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन हे काम कसे चांगले होईल यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असून यापुढे गावातील चांगल्या कामासाठी प्रत्येकाने प्राधान्य देणे गरजेचे बनले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. यावेळी डॉक्टर सोमनाथ गोरे पाटील यांचा अभिष्टचिंतन असल्यामुळे त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने केक कापून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश नाना गोरे, प्रवरा बँकेचे तज्ञ संचालक सोपान काका गोरे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील ट्रक वाहतूक संस्थेचे संचालक बाळासाहेब गोरे, हृदय सम्राट सेनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भाऊ गोरे, राजुरी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष जालिंदर पठारे, माजी लोकनियुक्त सरपंच सुरेश कसाब आप्पासाहेब कडसकर, एडवोकेट दत्तात्रय धनवटे, आर डी कदम, विष्णू खर्डे अण्णासाहेब बेंद्रे, राजेंद्र बोडखे सर, गोरक्षनाथ गोपाळे, सुधीर गोरे, विलास आहेर ज्ञानदेव दिवे, शिवनाथ गोरे, रमेश गोरे, गजानन गोरे, राजुरी सोसायटीचे सचिव बाळासाहेब गोरे, ग्रामपंचायत सदस्य हौशीराम जाधव, सोमनाथ कदम, मोरवाडी येथील पोलीस पाटील नवनाथ मोरे साहेब, संजय दरेकर सुनील दरेकर, पावले पाटील थोरात पाटील, जालिंदर बेंद्रे .नारायण बेंद्रे, ह भ प तुकाराम महाराज बनकर, सतीश तेलोरे रमेश त्रिभुवन. बाबासाहेब राहींज, चंद्रभान गुंजाळ, रावसाहेब रायबान गोरे राजेंद्र खंडागळे, भाऊसाहेब गोरे, यांच्यासह राजुरी येथील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट दत्तू भाऊ धनवटे यांनी केले