आ. सत्याजित तांबे यांच्यावतीने तुकाराम महाराज मंदिर सुशोभीकरणासाठी दहा लक्ष रुपये निधी मंजूर
टाकळीभान (प्रतिनिधी )
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेअंतर्गत टाकळीभान येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी दहा लक्ष रुपये निधी मंजूर केले आहेत.
या कामाबद्दल आ. सत्यजित तांबे यांचे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा कार्लस साठे सर, काँग्रेसचे ता. उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, जि. काँ. सरचिटणीस विष्णुपंत खंडागळे, ता. सरचिटणीस महेंद्र संत , श्रीधर गाडे, प्रा.विजय बोर्ड,प्रा. जयकर मगर,बंडोपंत बोडखे, गजानन कोकणे, बाबासाहेब तनपुरे, बंडोपंत कोकणे, मधुकर गायकवाड ,,संजय शिंदे,संदीप जावळे, सुरेश पवार ,सुनील बोडखे, रामनाथ माळोदे, शरद रणनवरे, सुनील रणनवरे, दादासाहेब कापसे ,संत तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ टाकळीभान आदींनी आ. तांबे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.