पंढरीत येणाऱ्या पायी दिंड्या व वारकऱ्यांना येणाऱ्या निवास व इतर समस्या निवारणाचा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व महसूलमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करणार –मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील
पंढरपूर (राजकुमार गडकरी)
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठू नामाचा जयघोष करत अनेक ठिकाणाहून हजारो पायी दिंड्या व लाखोंच्या संख्येने वारकरी आले होते. यापैकी अनेक पायी दिंड्यांना व वारकऱ्यांना मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेटी दिल्या . प्रत्यक्षात पायी दिंडीतही सहभाग घेतला तसेच दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन वारकऱ्यांच्या समस्यांची विचारपूस केली व येणाऱ्या समस्या निवारण करण्यासाठी नक्कीच आपण राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित दादा पवार तसेच राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू ,असे आश्वासन दिले.
मा. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी अनेक पायी दिंडी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पालखीचे दर्शन घेतले. वारकऱ्यांशी चर्चा केली. शिर्डी येथील श्री साईबाबा पालखी सोहळा तसेच कनकुरी , रुई, देर्डै, घारी, सावळीविहीर येथील त्याचप्रमाणे इतरही अनेक काही दिंडी सोहळ्याला त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या . शिर्डी, तसेच देर्डै, सावळीविहीर व विविध ठिकाणाहून आलेल्या पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने मा. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा भेटी प्रसंगी सत्कार करण्यात आला. घारी, देर्डै, चांदे कसारे, सावळीविहीर या दिंडीतर्फे ह भ प विश्वनाथ महाराज होन व ह भ प राजेंद्र महाराज पवार यांनी शाल श्रीफळ देऊन मा.खा.डॉ. सुजय विखे पा. यांचा सत्कार केला.यावेळी मा. खा.डॉ. सुजय विखे पा. यांनी पंढरपुरात येणाऱ्या पायी दिंड्यांना येणाऱ्या निवास व इतर अडचणी समजावून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राहता तालुक्यातील रुई गावचे सरपंच संदीप वाबळे, निमगावचे सरपंच कैलास कातोरे, श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, ह भ प संजय महाराज लोंढे, राजकुमार गडकरी ,राजेंद्र सुरासे, भीमा वर्पे, अशोक कुऱ्हे, सागर जाधव, पानगव्हाणे, अमोल कोकणे, रामेश्वर चव्हाण, दत्तू शिंदे,वक्ते, शेणवडगावचे भजनी मंडळ ,आदींसह कार्यकर्ते, वारकरी, उपस्थित होते.