ब्रेकिंग
अजय गायकवाड सेट परीक्षा उत्तीर्ण.
0
9
1
3
8
2
टाकळीभान( प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथील अजय रमेश गायकवाड हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या, महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता (सेट)परीक्षेत कॉमर्स हा विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
अजय गायकवाड हे चंद्ररुप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर चे विद्यार्थी आहेत. ते आदिवासी समाजातील असून त्यांनी त्यांचे शिक्षण एकदम गरीब व हलाखीच्या परिस्थितीत पूर्ण केले. प्रा.डॉ.यादव सर, प्रा. डॉ. केकाने सर, प्रा. डॉ. कुलकर्णी सर, प्रा. मनेष वेताळ सर ,प्रा.दुधाळ सर, प्रा. निलेश वखरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल घुमनदेव ग्रामस्थांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
0
9
1
3
8
2