Breaking
ब्रेकिंग

अवैधरित्या गांजा झाडांची लागवड.

0 9 1 3 8 1

 

 

 

 

अहमदनगर (सत्तेचा महासंग्राम न्युज )

पोखर्डी गावामध्ये अवैधरित्या गांजा झाडाची लागवड करणाऱ्या इसमावर कारवाई 92,500 / रुपये किमतीचा 37 किलो गांजा जप्त, एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यावरुन दिनांक 22/03/2024 रोजी सपोनि माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोखर्डी गावामध्ये इसम नामे यादव नाना साबळे रा. पोखर्डी ता जि. अहमदनगर याने अवैधरीत्या शेतामध्ये गांजाची लागवड केली आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्याने सदर घटनेबाबत मा. श्री. संपतराव भोसले सो. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांना कळविले. त्यांचे आदेशाने पोनि अरुण आव्हाड सो. प्रभारी अधिकारी व सुपा पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमंलदार यांचे पथक तयार करुन सदर ठिकाणी पंचा समक्ष छापा टाकला असता पोखडी गावामध्ये शेतात गांज्याचे झाडाची लागवड केल्याची मिळून आले. सदर शेतमालकाचे आजुबाजुला नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव यादव नाना साबळे रा. पोखर्डी ता जि. अहमदनगर असे सांगीतले. सदर गांज्याचे झाडे पंचासमक्ष जप्त करुन त्याचे वजन केले असता तेथे 37 किलो वजनाची एकूण 92500/- किमतीची गांजाची झाडे मिळून आले आहे. सदर गांजाची झाडे पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहेत.

 

सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला साहेव पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर, श्री. संपतराव भोसले सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शानाखाली पोनि अरुण आव्हाड प्रभारी अधिकारी सुपा पोलीस स्टेशन सपोनि माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई मनोज मोंढे, स.फी काळे, पोहेका/ नितीन उगलमुगले, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोहेकों राजु सुद्रिक, पोहेको कावरे, पोहेकॉ दिवटे, पोहेकों महमद शेख, पोना/ महेश बोरुडे, चालक पोहेकों गिरवले, पोकों/किशोर जाधव, पोकों नवनाथ दहिफळे, पोकों जयसिंग शिंदे, पोकॉ उमेश शेरकर, पोकों वंजारी यांचे पथकाने केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे