जपान येथील साई भक्तांची शिर्डीला भेट! घेतले साई दर्शन!! राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडेही गुरुपौर्णिमेला साई चरणी नतमस्तक!
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डीला दररोज देश-विदेशातील साईभक्त साई दर्शनासाठी येत असतात. गुरु पूर्णिमा उत्सवाला तर लाखोंच्या संख्येने हि साईभक्तांची संख्या असते . दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जपान येथील साईभक्तांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. रविवारी दि. २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी जापान येथुन १८ साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. हे विदेशी साईभक्त गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी शिर्डी येथे येवून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत
असतात. सालाबादप्रमाणे यावर्षीही त्यांनी गुरुपौर्णिमा उत्सवास शिर्डीत हजेरी लावून श्री साईनामाच्या जयघोषात त्यांनी श्री साईबाबांचे आशिर्वाद घेतले. ओम साई राम, जय जय साईराम म्हणत त्यांनी भजनाचा आनंद घेतला. त्यांचा साईसंस्थान तर्फे सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महाडुळे-सिनारे यांनी सत्कार केला.