टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
नेवासा तालुक्यातील वाकडी येथे एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती दुर्दैवी मृत्यू.शेण जमवलेल्या जुनाट विहिरीतील शोष खड्डा गाळामध्ये पडलेली मांजर काढण्यासाठी केलेल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना एका मागे एक काळे कुटुंबीयातील पाच जण विहिरीतील गॅस मुळे बेशुद्ध पडून गाळात गुंतून पाच जण ठार झाले तर एकाला वाचवण्यात यश मिळाले.
वाकडी शिवारातील अनिल बापूराव काळे यांच्या शेतावर असलेल्या शेणाचं गाळ जुन्या विहिरीत साठवलेला होता या विहिरीमध्ये मांजर पडल्यानंतर मांजर काढायला विशाल उर्फ बबलू अनिल काळे23गेला हे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल बापूराव काळे 58विहिरीत उतरले व वर आलेच नाही आणि हे पाहून शेजारच्याच शेतातील बाबासाहेब पवार35 हा त्यांना काढायला खाली गेला तो सुद्धा आत मध्येच गेला दरम्यान अनिल चे बंधू चुलत भाऊ संदीप माणिक आणि काळे36 हे रस्त्याने जात होते त्यांना आवाज दिल्यानंतर ते देखील विहिरीत उतरले आणि वर आलेच नाहीत हे पाहून त्यांचा वडील माणिकराव माणिकराव गोविंदराव काळे गोविंदराव काळे 65 त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतर ले आणि तो देखील बेशुद्ध होऊन त्या गाळातच रुतले दरम्यान विजय माणिक काळे 36 हा कमरेला दोर लावून विहिरीत उतरला लागल्यावर त्याने आवाज देतात लोकांनी त्याला वर काढला आणि आता त्याला खाजगी दवाखान्यात ऍडमिट केलेले आहे.
नेवासा पंचवीस किलोमीटर आंतर असलेल्या वाकडी शिवारामध्ये ही घटना साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली घटना समजतात तहसीलदार संजय बिरादार व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आपल्या कर्मचाऱ्यांचे हजर झाले येथील महिला पोलीस पाटील एडवोकेट अंजली काळे या उपस्थित झाल्या अहमदनगर श्रीरामपूर व औरंगाबाद बोलवण्यात आल्या रात्री आठ पर्यंत या टीम पोहोचल्यानंतर गावातील पाच प्रेते बाहेर काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
दरम्यान काळे कुटुंबात अजय माणिक काळे हा एकमेव पुरुष जिवंत आहे सध्या तो शेतीच करतो गुढीपाडव्याच्या मुहूर्त वाकडी गावात झालेल्या भीषण घटनेमुळे परिसरात शोककुल वातावरण आहे सुदैवाने वाचवले वाचलेला विजय काळे हा प्रथम नेवासा फाटा येथे व नंतर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालय त दाखल करण्यात आला आहे
चौकट– गाई म्हशींचे गोमूत्र व शेण साठवण्यात आलेल्या विहिरीमध्ये शोष खड्डा बनवण्यात आला होता त्यामुळे या विहिरीमध्ये विषारी वायू तयार झालेला होता विहिरीमध्ये प्रत्येक जण उतरलेला प्रथम बेशुद्ध पडून नंतर त्या गाळात रुतून निधन पावला.
चौकट- पाच जण मधील मयत माणिकराव काळे हे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले होते– सरपंच संभाजी रामदास काळे पाटील.