Breaking
ब्रेकिंग

राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र रुई येथे दिनांक ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत 131 वा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा! ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे दिनांक 12 ऑगस्ट रोजी होणार कीर्तन!

0 9 1 3 8 2

 

 

शिर्डी( राजकुमार गडकरी)

राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र रुई येथे दरवर्षोप्रमाणे यावर्षीही श्री. सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी सन 1894 साली घालून दिलेल्या संकेतानुसार 131 वा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत संपन्न होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाला मोठी परंपरा आहे.

‌या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ हा शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी कोपरगाव बेट येथील श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती सद्गुरु महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे परमपूज्य विश्वात्मक जंगलीदास महाराज व निमगाव (शिर्डी) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज आश्रमांचे श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते मंगल कलश स्थापना, पंचदीप प्रज्वलन, ग्रंथ,विना, टाळ व मृदंग पूजन करून होणार आहे.

या अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत दररोज पहाटे साडेचार ते सहा या वेळेत काकडा ,भजन तसेच सकाळी सात ते अकरा या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी साडेअकरा ते बारा या कालावधीत गाथा भजन ,तसेच दुपारी एक ते तीन वारकरी नियम भजन, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते 11 या कालावधीत श्रीहरी कीर्तन होणार आहे कीर्तनानंतर हरी जागर राहणार आहे.

या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह च्या पहिल्या दिवशी शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी संगमनेर येथील हभप माऊली महाराज जाधव यांचे कीर्तन होणार असून शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी हभप रूपालीताई सावने, परतुरकर यांचे कीर्तन होणार आहे तर रविवार 11 ऑगस्ट रोजी ह भ प संग्राम बापू भंडारे ,आळंदी देवाची यांचे तर सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे.

मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी आळंदी येथील हभप चंद्रकांत खळेकर महाराज यांचे तर बुधवार 14 ऑगस्ट 2024 रोजी बाभळेश्वर येथील हभप नवनाथ महाराज म्हस्के यांचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी येवला येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या हभप सुवर्णाताई जमधडे यांचे हरी किर्तन होणार असून शुक्रवारी एकादशीच्या दिवशी दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी रामानंदचार्य हभप समाधान महाराज शर्मा, केज यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे .तर शनिवार 17 ऑगस्ट 2024 या पारायण सोहळ्याच्या सांगता दिनी पिंपरी निर्मळ येथील श्री वरद विनायक आश्रमाचे संस्थापक व संत तुकाराम महाराज संस्थान नेवासा येथील अध्यक्ष ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांचे सकाळी दहा ते बारा या कालावधीत काल्याचे किर्तन होणार असून नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. व रात्री नऊ वाजता या दिवशी श्री रामकृष्ण शिंदे, श्री गंगाराम महाराज शेटे व सहकारी यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.

या पारायण सोहळ्यासाठी मृदंगाचार्य म्हणून हभप संतोष महाराज दीक्षित व ह भ प नितीन महाराज हरकळ तसेच गायनाचार्य म्हणून ह भ प रामकृष्ण महाराज चौधरी व ह भ प नकुल महाराज जाधव हे राहणार आहेत. तर या सप्ताह काळात रुई, कोहकी, शिंगवे, पिंपळवाडी ,शिर्डी ,निमगाव, निघोज, सावळीविहीर, कोकमठाण, कारवाडी, सडे येथील भजनी मंडळी राहणार असून चोपदार म्हणून ह भ प भिकाजी शंकराव वाबळे व ह भ प रमेश लक्ष्मणराव कामठे राहणार आहेत. तरी श्री क्षेत्र रुई तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे होणाऱ्या 131 व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या निमित्त होणाऱ्या सर्व किर्तनांचा, व सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र रुई येथील श्री महारुद्र हनुमान मंदिरापुढील सभा मंडपाचे बांधकाम चालू आहे. या ईश्वरी कार्यासाठी सढळ हाताने देणगी स्वरूपात ,रोख, ऑनलाइन किंवा वस्तू स्वरूपात मदत करावी. असे आवाहनही सप्ताह कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ श्रीक्षेत्र रुई यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे