Breaking
ब्रेकिंग

मुठेवाडगांव अतिक्रमण शिलशीला. केसेस मध्ये आ.लहुजी कानडे गटाचे विद्यमान सरपंच उपसरपंच एकाच वेळी अपात्र.

0 9 1 3 8 2

 

 

टाकळीभान प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव ग्रामपंचायतचे सरपंच सागर मुठे यांच्या वडीलांनी जमिनी लगतच्या शिवरस्त्यावर अतिक्रमण असल्याचे कागदोपत्री पुरावे वरून जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सरपंच सागर मुठे अपात्र घोषीत केले. तर उपसरपंच सौ.विजया भोंडगे यांचेही सरकारी जागेवर घरकुलाचे अतिक्रमण सिध्द झाल्याने नाशिक उपायुक्तसागर निलेश यांनी ऊपसरपंच विजया भोंडगे यांनाही अपात्र ठरविले. आमदार लहुजी कानडे गटाचे सत्ताधारी सरपंच उपसरपंच अपात्र झाल्यानें एकमेव महिला सदस्य पंचायतीमध्ये राहिल्या असून विरोधी विखे – मुरकुटे गटाचे सहा सदस्य पात्र राहीले आहेत.

मुठेवाडगांव ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये होऊन नऊ सदस्य संख्याबळात आ.लहुजी कानडे गटाचे पाच सदस्य तर विखे – मुरकुटे गटाचे चार सदस्य निवडून आले.सागर ज्ञानदेव मुठे हे बहुमतातील आ.कानडे गटाचे लोकनियुक्त सरपंच झाले. तर निर्मला पाचपिंड ऊपसरपंच झाल्या.निवडणुकीनंतर ग्रामपंचायतचे सुत्र हातात ठेवणाऱ्या परिवारातील एक महत्वाचे सीट पडले.हा पराभव जिव्हारी लागल्याने सव्वा महिन्यात त्या जागेवर निवडून आलेल्या सौ.लंकाबाई दिनकर मुठे यांच्यावर प्रथम अतिक्रमण केस दाखल केली. येथून पुढे कायम दोन्ही गटाने एकमेकांच्या सदस्या विरूद्ध “एकमेव अतीक्रमण” या मुद्द्यावरस आज अखेर तब्बल पावणे चार वर्षं घेरण्यास सुरूवात केली. सदस्या लंका मुठे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणाची तक्रार दाखल केली म्हणून विखे – मुरकुटे गटाने गोरख जाधव व उज्वला दिघे या आ.कानडे गटाचे सदस्या विरूद्ध अतिक्रमण केस दाखल केली.या पहिल्या केसेस मध्ये आ.कानडे गटाचे सदस्य अपात्र झाले. तर विखे मुरकुटे गटाच्या लंका मुठे यांच्या बाजूने निकाल लागल्याने पात्र राहिल्या . या निकालाविरोधात कानडे गटाने नाशिक उपायुक्त यांच्याकडे अपील करूनही दोन्ही सदस्य अपात्र राहीले. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात केस दाखल करण्यात येऊनही मेरीटवर दोन्ही सदस्यांनाअपात्र ठरविण्यात आले.

पुढे दोन जागेची पोटनिवडणूक होऊन विखे मुरकुटे गटांनी दोन्ही जागा पटकाविल्या. विखे मुरकुटे गटाचे सुत्रधार डॉ शंकर मुठे यांच्या पत्नी संगिता श़ंकर मुठे व किशोर साठे हे मताधिक्याने विजयी झाले. या पोटनिवडणुकीत सरपंच सागर मुठे यांनी संगिता शंकर मुठे यांच्या विरुद्ध अतिक्रमण तक्रार दाखल केली.निवडणुक अधिकाऱ्यांनी ती तक्रार फेटाळून लावल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले. हे अपील करतांना ज्ञानेश्वर जयवंत मुठे व अनिल रमेश मुठे या दोन सदस्या विरूद्धही तक्रारी दाखल केल्या. त्यामध्ये त्यांचे अर्ज फेटाळल्याने दोघेही पात्र राहीले पुढे नाशिक हे उपायुक्त अपिलातही पात्र राहीले. नंतर लंका मुठे यांच्या विरुद्ध पुन्हा तक्रार दाखल केल्याने विखे मुरकुटे गटाने ऊपसरपंच विजया भोंडगे यांच्या विरुद्ध घरकुल अतिक्रमण तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी निकालात त्या अपात्र ठरल्या.नाशिक उपायुक्त अपिलात त्यांना स्थगिती मिळाली.

या दरम्यान सदस्य ज्ञानेश्वर जयवंत मुठे यांनी सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी मुठेवाडगांव. – माळवाडगांव शिवरस्त्यावर गट क्र.१८जमिनीतून अतीक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली. या केसचा निकाल लागण्यापुर्वी सरपंच मुठे यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.परंतू ती फेटाळण्यात आली. उपसरपंच विजया भोंडगे यांच्या विरूद्ध नाशिक उपायुक्ताकडे नवीन अपील दाखल करण्यात आले होते.त्या अपीलात उपायुक्त सागर निलेश यांनी उपसरपंच विजया भोंडगे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांचा निकाल जैसे थे ठेऊन अपात्र ठरविले.विखे मुरकुटे गटाच्या वतीने अहमदनगर नाशिक येथे अँड अमोल धोंडे यांनी काम पाहिले तर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अँड विवेक तारडे यांनी काम पाहिले.

आता मुठेवाडगांव ग्रामपंचायत मध्ये सहा जागा विखे मुरकुटे एक जागा आ.कानडे गट तर दोन जागा अपात्र असे नऊ जागेचे बलाबल आहे. या निकालामुळे ग्रामपंचायत मध्ये आपली सत्ता येणार येणार असल्याने विखे मुरकुटे गटात आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे. हा अतिक्रमण केसेसचा शिलशिला पुढे थांबणार का ? सुरूच राहणार याकडे मतदार ग्रामस्थाचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे