सावळीविहीर बुद्रुक कारवाडी शिवारामध्ये बिबट्याचे दर्शन! शेतकऱ्यांमध्ये भीती! पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी!
शिर्डी( प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील कारवाडी व कोकमठाण, कारवाडी, कोहकी या परिसरामध्ये काही नागरिकांना गेल्या एक-दोन दिवसांमध्ये शेतात बिबट्या पाहण्यात आला असून या बिबट्याने काही कुत्रीही फस्त केल्याचे बोलले जात आहे. बिबट्यामुळे या परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने त्वरित येथे पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा .अशी मागणी येथील शेतकरी, नागरिकांकडून होत आहे.
सावळीविहीर बुद्रुक येथील कारवाडी तसेच कोकमठाण कोहकी या शिवारामध्ये बागायती शेती असून ऊस, मका सध्या शेतामध्ये असल्यामुळे बिबट्या या पिकांमध्ये दिवसा आसरा घेत आहे. रात्री शेळ्या कुत्रे यांच्यावर हल्ला करतो.असे येथील शेतकरी बोलत आहे. शेतकरी हे रस्त्याने जाता येता किंवा शेतामध्ये रात्री पाणी भरताना अचानक बिबट्या झडप मारण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तशी मोठी चर्चा आहे.महिला वृद्ध लहान मुले ही त्यामुळे घाबरत आहेत. यासंदर्भात माजी सरपंच अशोकराव आगलावे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री आमच्या मुलाला शेतात पाणी भरताना बिबट्या चे दर्शन झाले. तर प्रकाश आगलावे यांनीही बिबट्या पहिल्याचे त्यांनी सांगितले तसेच या बिबट्याने काही शेळ्या कुत्रे फस्त केल्याचेही शेतकरी बोलत आहेत. यामुळे रात्री शेतात पाणी भरण्यासाठी शेतकरी जाण्यास धजावत नाहीत. बिबट्याची भीती या परिसरात निर्माण झाली आहे. अनेक जण शेळ्या आपल्या घरात किंवा पॅकबंद पडवीत बांधत आहेत. या भागात काही दिवसापूर्वी रानडुकरांनीही हैदौस मांडला होता. हे रानडुकरे झुंडीच्या झुंडी शेतात येऊन शेतीचे नुकसान करतात. त्यांचाही वन विभागाने बंदोबस्त करावा. अशी मागणी माजी सरपंच अशोकराव आगलावे, जिजाबा आगलावे,राजेंद्र जपे, पप्पू गोपीनाथ आगलावे, शरद जिजाबा आगलावे, यांचे सह या भागातील शेतकरी, नागरिकांनी केली आहे.