श्री संत तुकाराम महाराज मंदिर बांधकामासाठी १३१ गोणी सिमेंट आदिक भावंडांच्या वतीने प्रदान.
टाकळीभान( प्रतिनिधी )
टाकळीभान येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराचे बांधकाम सुरू असून त्यासाठी विविध ठिकाणाहून मदतीचा स्रोत सुरू असून, नुकतेच श्री संत तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त मंडळ व सेवेकरी यांनी युवा नेते अविनाश आदिक व मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांची भेट घेतली.यावेळी
श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते, टाकळीभान { गोविंद सागर } चे जनक स्व.गोविंदरावजी आदिक साहेब यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर निर्माणकार्यासाठी युवा नेते अविनाश दादा आदिक व मा.लोकनियुक्त नगराअध्यक्षा अनुराधा ताई आदिक यांच्याकडून मंदिराच्या स्लॅबसाठी लागणार्या एकुण १३१ सिमेंट गोणी देणगी स्वरुपात दिल्याबद्दल युवा नेते अविनाशदादा आदिक व अनुराधाताई आदिक यांचे श्री संत तुकाराम महाराज विश्वस्त मंडळ व टाकळीभान ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. युवा नेते अविनाश दादा आदिक यांना भेटी प्रसंगी टाकळीभान येथील संत तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त व सेवेकरी बंडोपंत पटारे, द्वारकानाथ भालसिंग, देवा कोकणे, बाबा पांडे, राजेंद्र माने आदी उपस्थित होते.