दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनातील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनातील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत,
माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अहमदनगर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
पवित्र दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्याला घेऊन १ जुलै ला उसळलेल्या गर्दीनंतर नागपूर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनानंतर बांधकाम साहित्याची तोडफोड आणि साहित्य जाळपोळ केल्याप्रकरणी नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे. आंदोलक गुन्हेगार नाहीत त्यामुळे आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी विधानसभा सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना राज्याचे माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांनी केली.
१ जुलै ला दीक्षाभूमी परिसरात झालेल्या घटनेतनंतर बजाजनगर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १२५, १३२, १८९(२), १८९(५),१९०, १९१ (२), २९६, ३२६ (एफ), ३२६(जी) अंतर्गत गुन्हा पोलिसांनी दाखल केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांवर गुन्हा दखल करण्यात आले होते. हे विद्यार्थी शाळा आणि कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी असल्याने त्यांचा वरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी आ. डॉ. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
दीक्षाभूमी येथे पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे स्तूपाला धोका होईल, बोधिवृक्ष अडचणीत येईल त्यामुळे दीक्षाभूमी येथे भीमसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या शेकडो ज्ञात-अज्ञात आंदोलकांवर पोलिसांनी गंभीर प्रकाराचे गुन्हे दाखल केले आहे. प्रकरणी आम्ही आंदोलन करणारे आहोत गुन्हेगार नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी याअगोदर ही डॉ. राऊत यांनी सभागृहात लावून धरली होती.
******
नागपूर पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या सूचनाआमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज पुन्हा एकदा भूमिगत पार्किंग विरोधात दीक्षाभूमी येथे घडलेल्या घटनेत दाखल केलेले गुन्हे वापस घेण्याची मागणी केली असता यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत नागपूर पोलीस आयुक्तांना सूचना केले असल्याचे उत्तर दिले. ज्यामुळे आता गुन्हे दखल झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.