Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबा संस्‍थान मध्‍ये अनुकंपा प्रतिक्षासुचीतील कर्मचारि याना एकूण पंचवीस पदांवर अनुकंपा तत्‍वावर नेमणूका..

0 9 1 3 8 2

 

 

शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)

राजेंद्र दूनबळे

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव २०२४ च्‍या पुर्वसंधेला श्री साईबाबा संस्‍थान मध्‍ये सन २०१४ पासून अनुकंपा प्रतिक्षासुचीवर असलेल्‍या अनुकंपा उमेदवारांना दि.०१/०९/२०२० ते दि.३१/१२/२०२३ अखेर रिक्‍त झालेल्‍या पदाच्‍या १० टक्‍के पदानुसार गट क चे ०८ व गट ड चे १७ असे एकूण २५ पदांवर प्रतिक्षासुचीचे प्रथम प्राधान्‍य क्रमानुसार अनुकंपा तत्‍वावर नेमणूका संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते देण्‍यात आल्‍या. यामध्‍ये गट क चे एकूण ०८ पदांत आचारी – ०१ , लिपीक-टंकलेखक – ०५ व तारतंत्री – ०२ यांचा समावेश असून गट ड च्‍या एकूण १७ पदांत मदतनीस – १० व सफाई कामगार – ०७ यांचा समावेश आहे. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी नेमणूका दिलेल्‍या कर्मचा-यांना श्री साईबाबांची सेवा प्रमाणिक पणे करणेच्‍या व नेमून दिेलेली कामे जबाबदारीने पार पाडणेच्‍या सुचना दिल्‍या. यावेळी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मुख्‍य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, प्र.अधिक्षक रामदास कोकणे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे