Breaking
ब्रेकिंग

बहीण बनली भावाची पाठीराखीन…

0 9 1 3 8 2
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
 लोहगाव (वार्ताहर)कानडगाव ता. राहुरी : रविवार दि.18 जून 2023 रोजी रात्री 9.30 ते 10.00 च्या सुमारास…. बिबट्याने अचानक केलेल्या हल्यात.. कु.श्रद्धा भाऊसाहेब गागरे पाटील  या 15 वर्षाच्या बहिणीने.. आपल्या मोठ्या भावाला बिबट्याच्या हल्यातून ती स्वतः जखमी असतांना… वाचवले…
रविवार दि.18 जून रोजी..कु. श्रद्धा, व तिचे मोठे दोन भाऊ ( फोटोग्राफर कुणाल भाऊसाहेब गागरे पाटील व तेजस भाऊसाहेब गागरे पाटील ) लोणीहून ( फोटो जर्नलिस्ट श्री. दत्तात्रय नामदेव विखे पाटील ) मामाच्या घरून वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने कानडगांव ला रात्री मोटरसायकलने  येत होते.. घराच्या अगदी जवळ असतांना… गिन्नी गवतातून.. बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला… त्या हल्ल्यात.. ते तिघेही मोटरसायकल वरून खाली पडले…मोटरसायकल हा दुसरा मोठा भाऊ तेजस चालवीत असल्याने तो थोड्या अंतरावर जाऊन पडला…  या काळ्याकुट्ट अंधारात कु. श्रद्धा हिच्यावर बिबट्याने पंजाचा मारा केल्यामुळे ती जखमी झालेली होती..आणि खाली पडलेली होती…पण आपला मोठा भाऊ कुणाला..  हा बिबटच्या अगदी समोर पडलेला होता… अशा या काळ्याकुट्ट अंधारात कोणतेही हत्यार नसताना प्रसंगवधान राखून फोटोग्राफर कुणाल ने बिबट्याच्या अंगावर डोळ्यावर… हातात आलेल्या मातीचा मारा केला… आपला भाऊ बिबटच्या समोर पडलेला पाहून तिनेही जखमी असतांना…पळत जाऊन त्याच्यावर मातीचा मारा केला… त्यांनतर पुढे अंधारात पडलेला दुसरा मोठा भाऊ तेजस हा पळत आला.. त्याने नंतर बिबट्यावर ढेकूळ, दगड यांचा मारा केला… खूप मोठा आरडा आरोड झाल्यामुळे… आजूबाजूचे वस्तीवरचे लोक पळत आले… तेव्हड्या वेळात बिबट्या तिथून पसारा झाला…
वेळेचे भान राखून आपल्या भावाचे रक्षण  करणारी श्रद्धा ही खरच आपल्या भावाची पाठीराखान ठरली…
सदरील घटनेचा आसपासच्या परिसरातून लहान बहिणीने व तिच्या दोघं भावांनी दाखवलेल्या धाडसचे कौतुक होत आहे..
वन अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली व पिजऱ्याची व्यवस्था केली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे