तीन अल्पवयीन मुलींना गावातीलच एका भामट्याने फुस लावून पळुन नेले.
शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल.
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील तीन अल्पवयीन मुलींना गावातीलच एका भामट्याने फुस लावून पळून नेले शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल,
25 एप्रिल 2024 वार गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या दोन मुली वय 13 वर्षे व इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेली एक मुलगी वय 10 वर्षे अशा तीन मुली घेऊन गावातीलच एक भामटा संशयित आरोपी पोपट शहादेव बोरुडे वय 22 याने खोटे कारण गावातील पाटलांच्या घरी कुमारीका जेऊ घालायच्या आहेत अशी बतावणी करून गावातील एका मित्राच्या हिरो स्प्लेंडर गाडीवरून घरी कोणीही नसताना दिनांक 19 एप्रिल 2024 वार शुक्रवार रोजी सकाळी स. 11:30 वाजता नगरच्या दिशेने निघून गेला सुवासिनी जेऊ घालण्याच्या बहाण्याने तीन अल्पवयीन मुलीचे अपहरण. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दिलेला सविस्तर माहिती नुसार सदर मुलींचे वडील साखरपुड्याचे निमित्ताने ता. गेवराई जि. बीड येथील एका गावात गेले असता, त्यांना त्यांच्या मित्राने फोनवर संपर्क साधून कळविले की, त्यांचा मित्र नगर येथून गावी येत असताना, फिर्यादीच्या दोन मुली व त्याच्या भाचीला, गावातील एका युवकाने मोटारसायकलवर करंजी घरातून घेऊन जात असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दिसले. तो युवक नगरच्या दिशेने गेल्याचे सांगितले.
यावेळी तिन्ही मुली रडत असल्याचे दिसल्याने, संबंधिताने त्याची दुचाकी वळवत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, तो युवक त्या मुलींना तो पर्यंत घाट चढून पसार झाला होता.
याबाबत साखर पुड्याच्या निमित्ताने बाहेर गावी गेलेल्या मुलीच्या वडिलांनी खात्री करण्यासाठी घरी संपर्क साधला असता, त्यांना असे कळाले की, गावातील, एका भामटा युवक सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शेजारच्या मुलीसह, त्याच्या दोन मुलींना त्या युवकाने हाताला धरुन पाटलाच्या इथे सुवासिनी जेऊ घालायच्या आहेत, असे सांगून घेऊन गेला आहे. त्यानंतर त्या युवकासह मुलींचा शोध घेतला असता मिळून न आल्याने रात्री उशिरा याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधित युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष बाब प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेवगावचे पोलीस निरीक्षक श्री दिगंबर भदाणे यांनी तातडीने या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग LCB अहमदनगर यांचेकडे प्रकरण सोपविण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेबांना शिफारस केली आहे
गेल्या आठ दिवसांपासून एकाच गावातील तीन मुली फरार असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे आज त्या गावातील एक शिष्ट मंडळ अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांच्याकडे विशेष पथक नेमून तपास करण्यासाठी विनंती अर्ज सादर सादर करणार आहे ,–अविनाश देशमुख सामाजिक कार्यकर्ते.