मुंबईच्या एका साईभक्ताकडून एक कोटी रुपयाची सुंदर नक्षीकाम असलेली सोन्याची पंचारती साईचरणी अर्पण! तसेच मागील आठवड्यात हैदराबाद येथील साईभक्ताकडूनही साई चरणी एक कोटी आठ लाख रुपये किंमतीचा देणगी स्वरूपात मिळाला संस्थांनला डिमांड ड्राफ्ट!
शिर्डी ( राजकुमार गडकरी) शिर्डी येथील श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक मोठ्या संख्येने साई दर्शनाला शिर्डीत येत असतात. उत्सवाला लाखोच्या संख्येने फक्त येथे येत असतात . साई दर्शनानंतर मोठा श्रद्धेने साईभक्त श्री.साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज शनिवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथील एका साईभक्ताने साईचरणी १ किलो ४३४ ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली सोन्याची पंचारती अर्पण केली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या पंचारतीची किंमत जवळपास सुमारे १ कोटी रुपये असून ही सुंदर नक्षीकाम असलेली समई साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्कार केला.
तसेच, मागील आठवड्यात हैद्राबाद येथील एका साईभक्तानेही मोठी देणगी दिली होती. या हैदराबाद येथील भक्ताचा साईचरणी १ कोटी ८ लाख रुपये किंमतीचा डिमांड ड्राफ्ट प्राप्त झाला आहे.