टाकळीभान येथे पेविंग ब्लॉग रस्त्याचे नित्कृष्ट काम सुरू ” तरुणांने केला विरोध.
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
टाकळीभान येथे विविध विकास कामांचा डांगोरा पिटवला जात आहे मात्र आंधळ दळीत व कुत्र पीठ खात अशी गंमत झाली आहे. नुकतेच जिल्हा परिषद शाळा मागील पेवींग ब्लॉग चे काम सुरू आहे, परंतु तेथील ब्लॉग साठी वापरलेले ब्लॉगचे जॉब तुकडे ढीसूळ असून गावातील तरुणांनी ते ठेवलेले पेविंग ब्लॉगचे तुकडे सहज उकरत असून त्याचे सहज तुकडे होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे पेविंग् ब्लॉग वापरण्यात आले असून रस्त्याचे कामही निष्कृष्ट दर्जाचे होत आहे. एवढा निधी खर्चूनही रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसेल तर त्याबद्दल गावातील तरुणांनी नाराजी व्यक्त केली. या अगोदरही गावातील मेन पेठेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर रस्ता झालेला आहे तो सुरुवातीला जुन्या जिल्हा परिषद शाळेजवळ तेथील पीविंग ब्लॉग ही उखडत आहेत, त्याचेही तक्रारी नागरिकांनी पुढाऱ्यांसमोर केल्या होत्या. काम चांगली झाली नाही तर काही दिवसातच उघडलेली रस्ते पहायला मिळतील व गावच्या रस्त्यांची दिशा पहिल्यापेक्षा बेहतर होईल. यावेळी सदर बाब त्यांनी ग्रामसेवक रामदास जाधव यांच्या कानावर घातली असता रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ही गोष्ट गावातील तरुणांनी जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. याप्रसंगी सनी जाधव, बंडू नागले,मनोज पवार, विठ्ठल जाधव,अक्षय कोकणे,किशोर मैड,काकासाहेब जाधव,अजय डुकरे,शिवा गायकवाड,बाबसाहेब जाधव,रवी बोडखे आदी उपस्थित होते
चौकट : गावातील कामे निष्कृष्ट दर्जाची होत असून मागेही उपसरपंच खंडागळे यांनी नालीची व संडासाची कामे निष्कृष्ट दर्जाची होत असल्याबद्दल नाली खाणून नीदर्शनास आणून दिले होते. परंतु सर्व नीत्कृष्ट दर्जाची कामे डोळ्याने पाहून देखील गावातील सरपंच उपसरपंच व पदाधिकारी त्याच ठेकेदाराला कामे देतात, निकृष्ट कामे करणारा ठेकेदार यांना कसा चालतो असा एकच प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे?