आरडगावात महीलांची अवैध दारूवाले व पेताडांविरोधात धडक मोहीम
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
बाळकृष्ण भोसले
राहुरी : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये अवैध धंदेवाल्यांनी कहर केला आहे या त्राासाला कंंटाळून अखेर रणरागिणी महिलांनी एकत्र
येत आरडगावातील दारू अड्डे ताब्यात घेत या अवैध व्यावसायिक व पेताडांची अक्षरशः पळता भुई थोडी केली
या दारूमुळे गोरगरीब महीलांचे संसार उद्ध्वस्त होवून संसाराची राख रांगोळी झाली आहे तरूण मुला मुलीचे लग्न होत नाही तरूण मुले व्यसनाधिन होत आहे ऊन्हा तान्हात कमावलेले पैसे संध्याकाळी हिसकावून घेवून दारू पिऊन येतात हे सर्व धंदे बंद होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ अनिता जगधने यांनी पुढाकार घेऊन सर्व वंचित कष्टकरी पिडीत महीलांना घेवून सरपंच सुरेखा रविंद्र म्हसे ग्रामसेवक यांच्या समोर कथन करून तात्काळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी ठराव घेवून सरपंचासह राहुरी पोलीस स्टेशन गाठले व संबंधित पोलीस अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
परंतु निवेदन देवूनही पोलीस अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही ऊलट दारूधंदे चालूच होते हे पाहून अनिता जगधने यांनी मंगळवारी सकाळ पासून सर्व महिलांना घेवून दारू अड्यावर दारूड्यावर नजरा ठेवून चौका चौकात महीला ऊभ्या केल्या होत्या अशातच ससाणे नामक व्यक्ती ओढ्यात काट्यात दारू विकत असल्याचे कळाले सर्व महिलांनी ओढ्याकडे मोर्चा वळवला ही माहीती ससाणेला व दारूड्यांना कळाली त्यानी दारूचा बाटल्याचा बॉक्स काट्यातच टाकून काट्या काट्याने पळत सुटले. यावेळी महिलाही हातात दंडूके घेवून त्यांच्या मागे पळत असल्याने रणरागिनींचा रूद्र औतार पाहून दारू धंदेवाल्यांची व दारूड्यांची पळताभुई थोडी झाली काही धंदे वाले कड्याकुलपे लावून पळून गेली. सदर दारूचा बॉक्स पकडल्या नंतर महीलांनी पोलीस पाटील जाधव व रविंद्र म्हसे यांना बोलावून पोलीसांना बोलवून घेण्यास सांगितले तेव्हा चार दिवसांनी पोलीस आले महीलांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीसांचीही भंबेरी उडाली शेवटी अनिता जगधने यांनी ठणकावून सांगितले की जर पोलीसांनी अवैध दारू बंद केली नाही व संबंधितावर कारवाई केली नाहीतर ह्याच दारूच्या बाटल्या पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्या दालनात घेवून बसणार असुन जो पर्यंत बिट हवालदारचे निलंबन होत नाही तोपर्यंत तेथून ऊठणार नाही आमच्या जिविताला काही बरेवाईट झाल्यास बिटचे हवालदार पोलीस यांना जबाबदार धरण्यात यावे असे ठणकावून सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष सौ अनिता जगधने, वैशाली आव्हाड, नंदा माळी, कमल पवार, सिंधू बर्डे, उषा जाधव, सुरेखा थोरात, मिरा थोरात, पुष्पा आव्हाड, शांताबाई जाधव, द्वारकाबाई जाधव, मंगल जगधने, मनिषा जगधने, कुसुम जगधने इत्यादी महीलांना बघून दारूड्यांची व धंदेवाल्यांची चांगलीच भंबेरी उडाली