रस्त्यासाठी प्रहार व शेतकरी संघटनेचे दोन तास श्रीरामपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन.
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क डिजिटल मिडिया
राहाता( सत्तेचा महासंग्राम न्युज,)
प्रहार व शेतकरी संघटनेचा दोन तास श्रीरामपूर संगमनेर महामार्गावर दत्तनगर पोलीस चौकी समोर चक्काजाम
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात
शनिशिंगणापूर ते शिर्डी धार्मिक स्थळांना जोडणारा
श्रीरामपूर राहाता तसेच कोपरगाव या तीनही मतदार संघाच्या हद्दी मधून जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शिर्डी येथे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला तसेच या तीनही तालुक्यातील नागरिकांना व इतर प्रवाशांना दैनंदिन ये जा करण्यासाठी तसेच श्रीक्षेत्र शिर्डी ते शनी शिंगणापूर धार्मिक जोडणारा मुख्य मार्ग म्हणजेच श्रीरामपूर ते वाकडी गणेश नगर मार्गे शिर्डी रस्ता हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय सूडबुद्धीने व जाणीवपूर्वक गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित ठेवलेला आहे.
त्यामुळे या रस्त्याने सर्वसामान्यांसह दिव्यांग नोकरवर्ग साई भक्त शनि भक्त यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांना चालवताना अत्यंत मोठी कसरत करावी लागते त्यामुळे अनेक वेळा या रस्त्यावर मोठमोठे अपघात होऊन अनेकांना जीवही गमवा लागला या रस्त्याचा विकास होत नसल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांच्या नेतृत्वात व शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले यांच्या मार्गदर्शनात झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज दिनांक ४ रोजी श्रीरामपूर संगमनेर रोडवरील पोलीस चौकी समोरील वाकडी फाटा येथे सकाळी ११ वाजल्यापासून दोन तास भव्य रास्ता रोको करण्यात आला. यावेळी या रस्त्याने नेहमीच वहीवाट करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी एमआयडीसीतील नोकरवर्ग पंचक्रोशीतील शेतकरी सर्वसामान्य नागरिक वयोवृद्ध महिला उपजीविकेसाठी श्रीरामपूर व शिर्डी नगरीकडे दैनंदिन इजा करणारे तसेच इतर प्रवाशांनी सहभाग घेऊन या आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एका विद्यार्थिनीने परिवहन विभागाकडे बस संदर्भात विचारणा केली असता रस्त्याच्या दुर्दशेमुळे या बाजूने बस जात नाही. असा प्रतिसादही मिळाला त्यामुळे अनेकांना आपले शिक्षणही सोडण्याची वेळ आलेली आहे. अहो रात्र नोकरवर्ग या रस्त्याने वावरत असल्याने त्यांच्याही जीवतास धोका निर्माण झालेला आहे. यावेळी एका वयोवृद्ध महिलेने या रस्त्यामुळे तिच्यावर झालेला आघातही याप्रसंगी सांगितला कोणीही विचार करत नाही अशी व्यथा ही यावेळी सांगितले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी बोलताना असे सांगितले की या रस्त्या संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे रस्त्याच्या विकासासाठी इतके कोटी मंजूर आहेत .
सर्वसामान्य त्यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवावा यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे रूपेंद्र काले यावेळी श्रीरामपूर प्रहार विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब दूस. प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले. वाहतूक जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे .विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मण खडके शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप प्राहारचे पांडुरंग औताडे. श्रमिक सेवा संघाचे बाळासाहेब कराळे .श्रामपूर शहर प्रमुख सोमनाथ गरजे .देवळाली शहर प्रमुख प्रकाश वाकळे .राहाता युवक अध्यक्ष विजय काकडे. उपाध्यक्ष बाबासाहेब दिवे .उपप्रमुख राहुरी गणेश भालके .जमील शेख. विजय सोनवणे. आधार दिव्यांग संघटनेचे भारत चौधरी. रामदामाळे. मनोज धनवटे.
शेतकरी संघटनेचे युवराज जगताप. नानासाहेब गाढवे .गोपीनाथ खरात .
सरपंच धनगरवाडी
साहेबराव आदमाने. उपसरपंच
अनिल रक्टे. मा.उपसरपंच
अशोक रक्टे, रंगनाथ राशिनकर, लक्ष्मण राहींज, गौरव रक्टे, सतीश रक्टे, रोहन रक्टे डॉक्टर संपत शेळके वाकडी सरपंच रोहिणी ताई आहेर आधीच प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.