बेळगाव येथे वाल्मिकी रामोशी बेरड समाजाचे रविवार 6 ऑक्टोबर 2024 रोजी भव्य संमेलन!
शिर्डी (प्रतिनिधी)
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हास्तरीय वाल्मिकी, बेरड, रामोशी समाज संमेलन रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता बेळगाव येथे होणार आहे.
बेळगाव जिल्हा वाल्मिकी बेरड रामोशी समाज संमेलन रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता कुमार गंधर्व रंगमंदिर एस.पी ऑफिस जवळ, बेळगाव, कर्नाटक येथे आयोजित करण्यात आले असून या संमेलनामध्ये नूतन लोकसभा सदस्या कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांचा सत्कार व प्रतिभा पुरस्कार प्रदान सोहळा यावेळी होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री ना. सतीशअण्णा जानकीहोळी हे राहणार असून या समारंभाचे अध्यक्ष नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे महाराष्ट्राचे प्रांतअध्यक्ष वसंतराव चव्हाण हे भूषवणार आहेत. कार्यक्रमात महर्षी वाल्मिकी यांचे फोटो पूजन उत्तर बेळगावचे आमदार राजू (असिफ) सेट हे करणार असून मुख्य अतिथी म्हणून युवा नेते कुमार राहुल सतीश जारकीहोळी तसेच सौंदती यल्लमाचे आमदार विश्वास वैद्य, बैलहोंगल चे आमदार महांतेश कौजलगी, चित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे राहणार आहेत. अखिल कर्नाटक वाल्मिकी नायक महासभा बेंगलोरचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तलवार यांचे प्रास्ताविक भाषण यावेळी होणार आहे.
या कार्यक्रमाला वाल्मिकी बेडर रामोशी समाजाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, व समाज प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाज संघटनेचे अध्यक्ष राजशेखर तलवार, महिला विभाग अध्यक्षा श्रीमती शोभा निगांणी ,पांडुरंग पी. नाईक ,अशोक नाईक, दिनेश चंद्रशेखर बागडे ,संजय नाईक, नागेंद्र नाईक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.