बाभळेश्वर येथे डॉ विखे पाटील जयंती साजरी
बाभळेश्वर( सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे ग्रामपंचायत मध्ये पडमश्री डॉ विठ्ठल राव विखे पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव होतं. सहकारातील तज्ज्ञ म्हणून त्यांच्यातडे बघितलं जायचं. डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक होते. इंग्रज सरकारने आणलेल्या तुकडे बंदी आणि तुकडे जोड विधायकामुळे सावकारांच्या घशात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी हजारो शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन त्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. विखे पाटलांनी प्रवरानगरचा साखर कारखाना हा आशिया खंडातील सहकारी तत्त्वावर चालणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला गेला. विखे पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल 1961 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ते गोरखदादा गवारे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच राहुल डहाळे, कृषी सहाय्यक पुंड मॅडम, राजू कोकाटे, नारायण शिंदे, संजय बेंद्रे, तुळशीराम कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.