वरवंडीच्या धापलिंग रस्त्याकडे प्रशासनाची जाणिवपुर्वक डोळेझाक;
तहसीलदार यांना वरवंडीच्या ग्रामस्थांचे निवेदन.
संपत भोसले
आश्वी(प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने लेखी आश्वासन देऊनही संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील धापलिंग खंडोबा देवस्थान ते ठाकरवाडी रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाची जाणिवपूर्वक डोळेझाक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.हे गावच भ्रष्टाचाराच्या विळख्यात साडल्याची जोरदार चर्चा होत आहे
सविस्तर वृत्त असे की गेल्या तीन वर्षांपासून येथील एस. टी बी.टी.सी.एच ६७ स्थापलींग खंडोबा देवस्थान ते ठाकरवाडी व्ही आर ७० रस्त्या संदर्भात ग्रामस्थ व रिपब्लिकन पक्षाचे काही कार्यकर्ते या रस्त्याच्या कामाबद्दल पाठपुरवठा करत आहे हा रस्त्याचे २०२१ मध्ये काम चालू झाले.परंतु अद्यापही ते पूर्ण झाले नाही या रस्त्याबाबत रिपाईचे मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम वर्पे यांनी काही दिवसांपूर्वी अमरण उपोषण केले होते. नुकतेच या संदर्भात वरवंडीचे ग्रामस्थ व रिपाईचे आशिष शेळकेसह सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन हा अडचणीचा पाढा वाचला असता यावेळी गावातील नागरिकांनी रस्त्याच्या कामामध्ये अफरातफर झाली असे तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले यामधील ठेकेदार किरण दिघे यांनी काम पुर्ण केले नसताना या अर्धवट कामाचे ६० टक्के बिले संबंधित अधिकारी कसे आदा करु शकतात असा प्रश्न निर्माण करण्यात आला तहसीलदारांनी याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे तहसीलदार यांनी दुरध्वनीवरुन,संबंधित अभियंता यांना वरवंडी येथील जाऊन त्वरित रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले व पुढील काम लवकरात लवकर सुरू करावे असे आदेश दिले.
यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष भागवत बस्ते, सुभाष गागरे,संतोष वर्पे संपत भोसले सागर शिंदे रमेश भोसले भरत भोसले राहुल गागरे शरद शिंदे प्रदीप भोसले संगमनेर तालुक्यातील रिपाईचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष आशिष शेळके युवा अध्यक्ष योगेश मुन्तोडे ,शहराध्यक्ष कैलास कासार हे देखील उपस्थित होते.