Breaking
ब्रेकिंग

श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पंचाळे येथे होणार! तयारी जवळजवळ पूर्ण! त्यानिमित्ताने दि. 10 ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम तसेच श्री गंगागिरीजी कृषी महोत्सवाचे येथे आयोजन!

0 9 1 3 8 2

 

शिर्डी (राजकुमार गडकरी)

महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून प्रसिद्ध असणारा श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत श्रीक्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र येथे शहा ,पंचाळे तालुका सिन्नर व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर येथे आयोजित करण्यात आला असून तसे अधिकृतपणे सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्री क्षेत्र पुणतांबा येथे कामिका एकादशीला पंचाळे पंचक्रोशीतील भाविकांना नारळ देऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र या हरिनाम सप्ताह हा भव्य व मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा महा कुंभ असल्यामुळे त्याचे नियोजन हे अगोदरच मंहत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या सांगण्यावरून पंचाळे तालुका सिन्नर येथे करण्यात येत असून हरिनाम सप्ताहाची संपूर्ण पूर्वतयारी झाली आहे.

लेने को हरिनाम! देने को अन्नदान! तरणे को लीनता! डुबने को अभिमान !!असा उपदेश देणारे श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी 177 वर्षांपूर्वी या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली व सध्या या अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे भव्य दिव्य असे स्वरूप प्राप्त झाले आहे . मागील वर्षी हा सप्ताह वैजापूर येथे होता. मागील वर्षी या हरिनाम सप्ताहा ला लाखो भाविकांनी, वारकऱ्यांनी भेट दिली होती .

 

दर्शन घेतले, कीर्तन, प्रवचनाचा लाभ घेतला‌ त्याचप्रमाणे लाखोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. यावर्षी हा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज व संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी श्रीक्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे प्रारंभ होत असून या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 ला होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत दररोज सकाळी नऊ ते 11 या कालावधीत कीर्तन, दुपारी एक वाजता प्रवचन व त्यानंतर दुपारी दोन ते चार या कालावधीत सुद्धा हरी किर्तन वेगवेगळ्या हरिभक्त परायण कीर्तनकार महाराजांचे होणार आहे. दररोज आमटी भाकरीचा महाप्रसादही भाविकांसाठी देण्यात येणार आहे. महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे श्रीक्षेत्र पंचाळे व सिन्नर तालुका पंचक्रोशीच्या विद्यमाने आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी संपूर्ण झाली आहे. सप्ताहाचे ध्वजारोहण महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते येथे यापूर्वीच झालेले आहे. येथे सप्ताह साठी भव्य स्टेज ,भव्य मंडप ,महाप्रसादासाठी भव्य पटांगण, वाहन पार्किंग साठी भव्य असे मैदान, साफसफाई, विद्युत रोषणाई, आरोग्य, सुरक्षा, पिण्याच्या पाण्याची तसेच सार्वजनिक शौचालयाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे दररोज दुपारी एक ते दोन या कालावधीत प्रवचन सप्ताह ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी एकादशीनिमित्त दुपारी दोन ते चार या वेळेत महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे हरी किर्तन होणार आहे.व शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे भव्य काल्याचे हरिकीर्तन होणार असून त्यानंतर भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजनासाठी सिन्नर तालुका व शहा, पंचाळे पंचक्रोशी ,तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तसेच श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज 177 वा अखंड नाम सप्ताह कमिटी व योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज भक्त परिवार व श्रीक्षेत्र पंचाळे परिसर भाविक, ग्रामस्थ, भजनी मंडळ हे मोठे परिश्रम घेत आहेत.

तसेच अखंड हरिनाम सप्ताह ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावेळीही भारतातील भव्य असे आठ दिवसाचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कृषी प्रदर्शनानिमित्त दिनांक 10 ते 17 ऑगस्ट 2024 या दरम्यान श्री गंगागिरी कृषी महोत्सव येथे आयोजित करण्यात आला असून अखंड हरिनाम सप्ताह व श्री गंगागिरी कृषी महोत्सव याचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन 177 वा अखंड हरिनाम सप्ताह कमिटी, संत योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त परिवार व शहा, पंचाळे व सिन्नर तालुका पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे