बाभळेश्वर येथे मराठा आरक्षणासाठी शंभर टक्के गाव बंद
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
प्रकाश औताडे बाभळेश्वर
गुणरत्न सदावर्ते याचा पुतळा जाळत केला निषेध
बाभळेश्वर (सत्तेचा महासंग्राम वृत्तसेवा)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागासवर्गीयांमधून आरक्षण मिळावे यासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गाव बंदचे आव्हान करण्यात आले होते. त्यामुळे बाभळेश्वर येथील आत्यावश्यक सेवेसह गावातील पान टपऱ्या ,किराणा व्यवसायिक ,फळ विक्रेते ,हॉटेल तसेच छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी आपले व्यवसाय स्वयंपूर्तीने बंद करून संपूर्ण बाभळेश्वर चौक , तसेच दूध संघावरील दत्तनगर यशवंत नगर सकाळपासूनच 100% कडकडीत बंद मध्ये स्वयंपूर्तीने सहभागी झाले होते. सकाळी गावातील मराठा समाज ,सर्व तरुण मंडळे, संस्थांचे पदाधिकारी बाभळेश्वर ग्रामस्थ विविध जाती धर्माचे नागरिक एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे , मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं च्या घोषणा देत मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविला. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळा बाभळेश्वर चौकात जाळण्यात आला .कडक उन्हाळा व बाभळेश्वर बंद यामुळे मात्र बस स्थानकावरील प्रवाशांचे पिण्याचे पाण्यासाठी मोठे हाल झाले. बंदमध्ये बाभळेश्वर संपूर्ण सहभागी झाले होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी शिवसेनेचे मार्गदर्शक गंगाधर बेंद्रे, शिवसेना अध्यक्ष अण्णासाहेब आरगडे, उपाध्यक्ष कारभारी बेंद्रे , भाऊसाहेब मोरे ,ज्ञानदेव खोबरे ,सोमनाथ गोरे ,विधीतज्ञ भास्कर पठारे, पत्रकार गोरखदादा गवारे, तुकाराम बेंद्रे, सुरेश बेंद्रे, दादा तांदळे ,राऊसाहेब भालेराव ,शिवाजी गोरे, सुहास बेंद्रे ,रमेश बेंद्रे ,आदी सकल मराठा समाज यावेळी उपस्थित होता.