गुड टच बॅड टच मार्गदर्शन कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबवावा डॉ. वंदनाताई मुरकुटे
श्रीरामपूर( प्रतिनिधी )
प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गुड टच बॅड टच मार्गदर्शन संदर्भात कार्यक्रम राबवावा असे प्रतिपादन प्राईड अकॅडमी येथे सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड टच , बॅड टच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी डॉ. मुरकुटे बोलत होत्या.
यावेळीबालमनोविकार तज्ञ डॉ. पूजा नगरकर, प्राचार्य विनोद जोशी, प्राईडच्या समन्वयक प्रिती गोटे, शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रि स्कूल, प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे तीन सेषन करून त्यांना डॉ. पूजा नगरकर यांनी गुड टच बॅड टच बद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्हिडिओ क्लिप स्लाईड्स द्वारे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून आपले प्रायव्हेट पार्ट्स कसे सांभाळावे, आपल्याला त्रास झाल्यानंतर आपले आई-वडील शिक्षक यांना कसे सांगावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाबद्दल डॉ पूजा नगरकर यांचा प्राईड अकॅडमीच्या संचालिका डॉ. वंदना मुरकुटे यांनी सत्कार केला. व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. त्याप्रसंगी शिक्षिका अश्विनी जगताप , ऍना लोखंडे , वृशाली ताके ,पूजा कांडेकर आदि उपस्थित होते.