आषाढी निमित्त घुमनदेव शाळेची पायी दिंडी सोहळा
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
घूमनदेव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी पायी दिंडी सोहळा सप्तलिंग शिवालय आश्रम घुमनदेव येथे साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुख्मीणी यांचा पोशाख परिधान करून छोट्या वारकऱ्यांनी आनंद साजरा केला यावेळी भजन फुगडी खेळत विठ्ठलाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला होता,
यावेळी शिवसेना श्रीरामपूर तालुका संघटक पप्पू महाराज गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्यावेळी आम्ही या शाळेत शिकत होतो त्यावेळेस असे उपक्रम राबवले जात नव्हते तरी आत्ताचे शिक्षक ज्या मेहनतीने हे सर्व उपक्रम राबवतात त्याबद्दल शाळेच्या आभार मानले.
यावेळी शिवयोगी नटराज महाराज व पप्पू महाराज गायकवाड यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. यावेळी शिवयोगी नटराज महाराज ,पप्पुमहाराज मुख्याध्यापिका महापुरे मॅडम तसेच आनंद वाघ सर, संजय शिंदे सर ,कांगुणे मॅडम,सागर वाघमारे,रवी शिंदे,अनिल डिके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.