पत्रकारावर हल्ला केल्या प्रकरणी अखेर शिंदे वर गुन्हा दाखल…
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
दिलीप लोखंडे
टाकळीभान(डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
: टाकळीभान येथील दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार अर्जुन राऊत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या प्रकरणी महाराष्टृ प्रसार माध्यम व्यक्ती प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्ते नुकसान प्रतिबंधक)अधिनियम,2017 च्या कलम (3)(4) व भा.द.वि 323,504,506 व 427 कलमा नुसार आरोपी बापू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पत्रकार विरोधी हल्ला संरक्षण कायद्यास मंजुरी दिल्यानंतर प्रथमच अंमलबजावणी होताना दिसत असून पत्रकारावर हल्ले करणाऱ्यांना यामुळे येथून पुढे चांगली चपराक बसणार असून पत्रकारांना या कायद्या अंतर्गत संरक्षण मिळणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अर्जुन राऊत टाकळीभान येथे पत्रकारितेचे काम करत असताना त्याच गावातील आरोपी बापूसाहेब केरू शिंदे यांनी एक वर्षांपूर्वी अतिक्रमण संदर्भात बदनामीकारक बातमी छापल्याचा राग मनात धरून अप्रत्यक्षरीत्या फिर्यादीची बदनामी केली तसेच वेळोवेळी पत्रकार राऊत यांना वेळोवेळी दम देऊन शिवीगाळ करून मला माझ्या विरोधी बातम्या छापू नको नाहीतर तुला जिवे मारीन अशी धमकी देत असे, तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे बातमी छापली नाही तर तुला पत्रकारिता करू देणार नाही व तुझी बदनामी करेल असे म्हणत नेहमी त्रास देत असे.
सदर घटनेनंतर 9 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 8 चे सुमारास राऊत हे त्यांच्या टाकळीभान येथील श्रीरामपूर नेवासा रोड वरील विठ्ठल रुक्मिणी कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आपल्या कार्यालयात पत्रकाराचे काम करत असताना बापूसाहेब केरू शिंदे राहणार टाकळीभान हा तेथे आला व फिर्यादीस म्हणाला की तु मी सांगितलेल्या बातम्या पेपर मध्ये का छापत नाही. व माझ्या बदनामीकारक बातम्या छापतो व माझे विरोधात पोलीस स्टेशनला अर्ज देतो, त्यावेळी फिर्यादी त्याला नीट बोल असे म्हणाला असता त्याचा राग येऊन त्याने फिर्यादीची गचंडी धरून लाथा बुक्क्यांनी मारहान करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कार्यालयातील फर्निचर व साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. सदर घटनेबाबत दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार अर्जुन राऊत यांनी पोलीस स्टेशनला समक्ष येऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार रीतसर फिर्याद दाखल होऊन शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे करत आहे.