Breaking
ब्रेकिंग

चाॅकलेटचे अमिष देत चिमुकल्यांच्या अपहरणाचा प्रयत्न, पिंपळगाव फुणगीतील प्रकार 

0 9 1 3 8 1

सत्तेचा महासंग्राम

ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया

बाळकृष्ण भोसले
राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जात असताना रस्त्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी प्रथम चाॅकलेटचे अमिष दिले चिमुकले नको नको म्हणत जात असताना नंतर चाकूचा धाक दाखवत अपहरणाचा प्रयत्न घडला परंतू चिमुकल्यांच्या प्रसंगावधनाने हा प्रयत्न फसला राहुरीचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल होत शोधमोहिम सुरू केली
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील पिंपळगाव फुणगी गावच्या शिवारातील हनुमानवाडी परिसरात जिल्हा परिषदेची इयत्ता ४ थी पर्यंत प्राथमिक शाळा आहे दोन शिक्षकी शाळेत साधारण ४० ते ५० पटसंख्या आहे या शाळेत वाड्यावस्त्यांवरून चिमुकले शिक्षणासाठी येतात काही पालक स्वतः मुलांची ने-आण करतात तर काही मुले स्वतःच्या सायकल वरून शाळेत ये-जा करतात अशीच शाळेपासून साधारणतः एक किमी च्या अंतरावरून आयुष सुदर्शन फुणगे हा ८ वर्षे वयाचा इयत्ता ३ रीत शिकत असलेला व दुसरा पियुष गोरक्ष वडितके हा ९ वर्षे वयाचा ४ थी इयत्तेत शिकत असलेले दोन चिमुकले आपापल्या सायकलवरून शाळेत येत असताना शाळेच्या जवळ मारूती मंदिरापासून पुर्वेकडे शाळेकडे जात असताना चिंचोली फाट्याकडून देवळाली प्रवरा रस्त्यावरून एका दुचाकीवरून दोघे तरूण अज्ञात इसम जात होते त्या तरूणांनी या चिमुकल्यांजवळ आपल्या दुचाकीचा वेग कमी करून तुम्हा दोघांना चाॅकलेट देतो आमच्याबरोबर चला म्हणाले मात्र आम्हाला चाॅकलेट नको म्हणत तसेच हे चिमुकले शाळेच्या दिशेने सायकल मारत चालले थोडे अंतर जाताच मात्र या दुचाकीवरील इसमापैकी मागे बसलेल्याने आपल्या खिशातून धारदार चाकू काढत थांबा नि आमच्याबरोबर येण्याची बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तथापी या चाणाक्ष चिमुकल्यांनी धाडस दाखवत तशीच जोरात सायकल घेत शाळा गाठली व इतर मुलांना घडलेला प्रकार सांगितला मुलांच्या आरडाओरडण्याने शेजारी असलेल्यांनी शाळेकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत या इसमांनी पोबारा केला
तसे ते इसम शाळेच्या समोरील रस्त्याने पिंपळगाव फुणगीच्या दिशेने जात पाच सात मिनिटात परत फिरत शाळेच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ थांबत फोनवर बोलून पुढे गुहाच्या दिशेने गेल्याचे या चिमुकल्यांनी सांगितले
दरम्यान घडलेला प्रकार पोलिस पाटील संजय फुणगे यांनी पोलिसांना कळविला पोलिस काॅ. प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, भाऊसाहेब शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली चिंचोली-देवळाली रस्त्यावरील उपलब्ध सीसीटिव्ही फुटेज तपासून तसेच सदर इसम फोनवर बोलत असल्याच्या माहितीवरून मोबाईल कंपन्यांकडून स्थानिक टाॅवरच्या अंतर्गत दरम्यानच्या काळातील मोबाईल संभाषणाची माहिती घेणार असल्याचे सांगितले आहे

 

राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत आव्हाड अधिक तपास करीत आहेत
दरम्यान पालकांनी आपापल्या पाल्यांना स्वत शाळेत ने-आण करावी किंवा समुहाने शाळेत पाठवावे शाळेच्या वेळेच्या १५ ते २० मिनिटे अगोदर पाठवावे शाळेच्या वेळेत शिक्षकांनी मुख्य गेट बंद ठेवावे शाळेत येणारा अनोळखी इसमास प्रवेश देऊ नये किंवा पुर्ण खात्री पटवून घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना भेटू देवू नये संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिस ठाण्यात ०२४२६,२३२४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरिक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे