टाकळीभान येथील तुकाराम महाराज मंदिर सभामंडपासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले नऊ लक्ष रुपये जाहीर.
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
टाकळीभान येथे खा. वाकचौरे तुकाराम महाराज मंदीर सभामंडपासाठी ९ लक्ष रूपये केले जाहीर. पहिल्या टर्म मध्ये खासदार असताना बहूतांश मंदीरांना सभामंडप देण्याचे काम केले. सुरुवातीला काहींना हा निर्णय चुकीचा वाटला मात्र गावोगावी सभामंडप निर्माण झाल्यामुळे धार्मिक कार्यक्रम वाढले व जातीय सलोखा निर्माण झाला. वृध्दांना व वाटसरूंना बसण्याचे ठिकाण मिळाले व मतदार संघात गावोगावी सभामंडप देणारा खासदार म्हणून कौतूक झाले. असे सांगून टाकळीभान येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीर सभामंडप निर्माण कार्यासाठी ९ लक्ष रूपये निधी देत असल्याचे विद्यमान शिर्डी लोकसभेचे शिवसेना (उबाठा) गटाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी जाहीर केले. व टाकळीभान येथील विविध प्रश्न सोडवण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. टाकळीभान येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीर निर्माण कार्यास खा. वाकचौरे व रोहीत वाकचौरे यांनी सदीच्छा भेट दिली. प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सचिन बडदे, तालुकाप्रमूख, शहरप्रमूख राधाकिसन बोरकर, निखील पवार, रोहीत भोसले, सदाशिव पटारे, शिवाजी दौंड, बाळासाहेब कुशीकर, नाना ब्राम्हणे, युवासेनेचे अक्षय कोकणे, विश्वनाथ वाघुले तसेच तुकाराम महाराज मंदीराचे सेवेकरी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचा उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सत्कार केला.
पुढे बोलताने खा. भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, टाकळीभान येथील अंतर्गत वा बाह्य रस्त्यांनाही निधी देणार असून त्यासाठी मला रस्त्याची नावे द्यावीत. तसेच बर्याच वर्षापासून वारंवार मागणी करूनही प्रलंबीत असणार्या व अतिशय दुर्दशा झालेल्या टाकळीभान-बेलपिंपळगाव रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी देऊन लवकरच रस्त्याच्या कामाला
सुरूवात करण्यात येईल. तसेच टाकळीभान टेलटैंक पुर्ण क्षमतेने भरून द्यावा यासाठी पाटबंधारे विभागाला सूचना केल्या असून टेलटैंक परिसरात वृक्षारोपन, जॉगींग पार्कचा आराखडा बनविण्यात येणार असून टाकळीभान गावाला निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी यावेळी नमूद केले.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदीर सभामंडप निर्माण कार्यास ९ लक्ष रूपये निधी तसेच टाकळीभान- बेलपिंपळगाव रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद करणार असल्याचे मान्य केले असून टाकळीभान ग्रामपंचायतचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी त्यांचे आभार मानले.