Breaking
ब्रेकिंग

लोहगाव येथे सकाळीच नऊ वाजता लोकवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

0 9 1 3 8 2
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
लोहगाव( डिजिटल मिडिया वृत्तसेवा)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे नगर मनमाड रोड  जवळील पाटीलवाडी वस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे . रात्रीच्या वेळी
बिबट्याने किरण दरंदले यांच्या गोठ्यातील एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. आता रात्र सोडा आता दिवशीही बिबट्याची लोकवस्तीवरील बिबट्याच्या दर्शनामुळे  नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झालेली आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट त्यात पशुधन वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड आणि दुसरीकडे बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी  हवालदिल ह्या दुहेरी संकटात शेतकरी आता सापडलेला आहे शासकीय अधिकाऱ्यांना  व वनविभागाच्या  अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली असता त्यांनी मात्र या गोष्टीचे फारसे गांभीर्य दाखवले नाही .
याचा अर्थ असा होतो की वन विभागाचे अधिकारी सर्व  घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून शासकिय जी रक्कम असेल ती तुम्हाला मिळेल असे आश्वासन देऊन निघून जातात पण सोन्यासारखी जनावरे  गाया मेंढ्या  शेळ्या मुलापेक्षाही अधिक जीव लावले असताना डोळ्यादेखत बिबट्या जर त्यांना ओढून उसाच्या रानात घेऊन जात असला तर काय करावे .
असाच प्रश्न आता शेतकरी व सर्वसामान्य शेतमजुरांवर पडलेला आहे या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता न घेतल्यास येथील कार्यकर्ते सदर निवेदन प्रांत अधिकारी यांना देऊन लक्ष वेधणार आहे .लोहगाव मध्ये   बिबट्याचे सातत्याने
 हल्याणे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहे. आता तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा येथील शेतकरी लवकरच जिल्हाधिकारी किंवा प्रांत कार्यालय येथे जाऊन या संदर्भात निवेदन देणार आहे तरी सदर विभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून  बिबट्याला जरबंद करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 3 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे