वीज तारांच्या स्पार्किंग होऊन दोन एकर ऊस भस्मसात; लाखोंचे नुकसान
सत्तेचा महासंग्राम
ऑनलाईन न्युज नेटवर्क डिजिटल मिडिया
बाभळेश्वर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर बुद्रुक येथील वीज वितरण तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दोन एकर ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बाभळेश्वर बुद्रुक येथील गट नंबर १३९ मधील शोभा ज्ञानदेव म्हस्के यांच्या मालकीचा दोन एकर ऊस जळुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागताच संबंधित ऊस मालकाला आग लागलीची माहिती दिली परंतु तो पर्यंत अगिनी संपूर्ण ऊसाला वेढा घातला होता. या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी ऊसाला आग लागल्याचे नागरिकांचे लक्षात येताच मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा झाले होते महावितरणच्या लांबलेल्या तारांमुळे शॉट सर्किट होऊन सदरची आग लागल्याची महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून यासंदर्भात दिले असता परंतु कोणी अधिकारी या ठिकाणी फिरायला नाही मग त्या संदर्भात एक पत्र महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच लोणी पोलीस स्टेशन देखील या संदर्भात या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
यावेळेस अधिकारी म्हणाले की उद्या या घटनेचे आम्ही प्रत्यक्ष पाहणी करू अशी माहिती संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. एकीकडे दुष्काळाची सावट यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण त्यातच शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे .यावर्षी कुठल्याही शेतीमालाला योग्य असा भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झालेला आहे .त्यातच अशा घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे .तसेच महसूल खात्याचे अधिकार व संबंधिताना सदर घटनेची माहिती देण्यात आलेली आहे.