महाराष्ट्र
केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव तसेच सरला बेट चे महंत रामगिरीजी महाराज यांनी आज शिर्डीला भेट देऊन घेतले साई दर्शन!
0
9
1
3
8
2
शिर्डी( प्रतिनिधी)
केंद्रीय रेल्वे तसेच माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सरला बेट येथील मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी आज शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके , संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.
0
9
1
3
8
2