कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयाच्या राज्य कार्यकारिणी जिल्हाध्यक्षपदी. डॉ.शरद दुधाट
लोहगाव ( सत्तेचा महासंग्राम न्युज)
राहाता तालुक्यातील प्रवरनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे प्रा.शरद दुधाट यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विषय राज्य कार्यकारिणीची आभासी बैठक अध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीमध्ये सचिव प्रा. बाळासाहेब माने यांनी राज्याच्या मुख्य कार्यकारणीसह मराठी विषयाची ३५ जिल्ह्यांची जिल्हाध्यक्षांची निवड या कार्यकारणीमध्ये जाहीर केली. मराठी विषय राज्य कार्यकारिणीसाठी अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शरद दुधाट यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, जनरल बॉडी सदस्य एकनाथ घोगरे, मराठी राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, सचिव प्रा. बाळासाहेब माने, सहसचिव प्रा. डॉ. स्मिता भुसे, प्राचार्य अंगद काकडे, उपप्राचार्य अलका आहेर, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, सुभाष भुसाळ, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष सोपानराव कदम, सचिव सुनील गोरे, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, कोंडीराम नेहे, बाबासाहेब अंत्रे आदींसह शिक्षक प्राध्यापक ग्रामस्थ विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
.