श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी ९ कोटीची मंजुरी मिळाली. फटाके वाजून आनंद व्यक्त केला,
टाकळीभान (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्प जुलै २०२४ मध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना ९ कोटी रुपये मंजुरी मिळाली असून यामध्ये टाकळीभान ते गणेश खिंड रोड यासाठी ३ कोटी रुपये मंजूर झाल्याने टाकळीभान येथील आ. लहू कानडे मित्र मंडळ ,व्यापारी व ग्रामस्थ यांनी टाकळीभान गणेश खिंड रोडवर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. टाकळीभान उपबाजार आवारा लगत जाणारा हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून त्याची अतिशय दयनीय अवस्था होऊन तो खराब झाला होता. गावातील पदाधिकारी व नागरिकांच्या त्यासाठी वारंवार मागण्या होत्या, त्यानुसार रस्त्यास मंजुरी मिळाली असून गावातील व्यापारी नागरिक यांनी कानडे यांना धन्यवाद दिले आहेत. त्याचप्रमाणे टाकळीभान बेलपिंपळगाव रस्ताही प्रस्तावित असून त्यासाठी ही आ. लहुजी कानडे साहेब प्रयत्न करणार असल्याचे मा. नगरसेवक अशोक नाना कानडे यांनी सांगितले. याप्रसंगी या महत्त्वाच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. कार्लस साठे सर यांनी आ. कानडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. यावेळी काँग्रेसचे ता. उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, बोडखे, गजानन कोकणे,मधुकर गायकवाड, सुनील बोडखे,व्यापारी प्रकाश काठेड, दीपक बनकर, दिनकर गौड, जालिंदर ढोले दादासाहेब कापसे आदी सह व्यापारी नागरिक उपस्थित होते,